Homeताज्या बातम्यादेवळालीत दीपोत्सव साजरा.

देवळालीत दीपोत्सव साजरा.

दिव्यांच्या प्रकाशाने उजळला आसमंत.
आरती, फटाक्यांची आतषबाजी, प्रसाद वाटप, भक्ती गीत गायन, कार्यक्रम संपन्न.
श्रीकृष्ण, श्री हनुमान मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई.
भगवे झेंडे, पताकांची सजावट.

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प
अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला देवळालीच्या मेन रोडवरील श्रीकृष्ण मंदिर तसेच श्री हनुमान मंदिर समोर दीपोत्सव साजरा करण्यात आला. महिला भगिनींनी रस्त्याच्या दुतर्फा आणि मंदिरासमोर शेकडो दिवे प्रज्वलित करून आनंदोत्सव साजरा केला. कलाशिक्षक सुरेश म्हैसधुणे यांनी मंदिरासमोर रांगोळी रेखाटली होती. श्रीकृष्ण मंदिरात आरती करण्यात आली. महिलांनी भक्ती गीत गायन, नृत्य केले. मंदिरासमोर शोभेच्या फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या उत्सवात छाया हाबडे, वैशाली महाजन, प्राजक्ता महाजन, सुजाता राहाणे, अंजली ठाकरे, प्रिया गायकवाड, श्रद्धा हाबडे, लक्ष्मी वटारे, कोमल हाबडे, यामिनी पाटील, ज्योती दशपुते, अश्विनी हाबडे, प्रज्ञा दोंदे, निशा प्रजापती, श्रीमती झोंबाड, श्रीमती बुंदेले आदींसह भजनी मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दीपोत्सव यशस्वीतेसाठी दिनेश हाबडे, सचिन ठाकरे, संजय हाबडे, महेश गायकवाड, मुकेश गायकवाड, प्रशांत काजळे, रोहित नानेगावकर, निमिष प्रजापती, सुनील गुप्ता, रवींद्र हाबडे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी सुभाष कांडेकर, प्रमोद रहाणे, मंगेश गुप्ता, श्री तिवारी, ऍडव्होकेट फल्ले, सतीश कांडेकर, भैय्या परदेशी, निलेश बंगाली आदींसह भाविक उपस्थित होते. जुन्या मध्यवर्ती बस स्थानकावर श्रीराम भगवान प्रतिष्ठानने अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. छावणी परिषदेने प्रत्येक पथ दिपावर तिरांग्याची विद्युत रोषणाई केली आहे. भगवे ध्वज, पताका आणि विद्युत रोषणाईने शहर उत्सवासाठी नटले, सजले आहे. सोमवारी दिवस भर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सर्वत्र असणार आहे. शहर रामनामात दंग होऊन राम नामाचा जयघोष दुमदुमणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!