Homeदेशातील बातमीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

प्रतिनिधी l देवळाली कॅम्प : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सौ. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सोमवारी दुपारी भगूर येथील स्वा .वि. दा सावरकर जन्मस्थान स्मारकात भेट देऊन सावरकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

तत्पूर्वी नाशिक रोड वरून भगूरच्या दिशेने येत असताना त्यांचे लेमरोड, देवळाली कॅम्प, देवी मंदिर तसेच भगूर आहुजा कॉम्प्लेक्स चौफुलीवर शिवसैनिकांकडून स्वागत करण्यात आले. अहुजा कॉम्प्लेक्स वरील संभाजी चौक येथे त्यांनी शिवसेना शाखेचे उद्घाटन केले. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या निवासस्थानी भेट दिली त्या ठिकाणी विजय करंजकर, माजी नगराध्यक्ष अनिता करंजकर ,माजी नगरसेवक रंगनाथ करंजकर, रोहित करंजकर, किशोर करंजकर, गोरख करंजकर या परिवाराच्या सदस्यांच्या वतीने स्मृतीचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन ठाकरे परिवाराचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे भगूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले. छत्रपती शिवरायांच्या अर्ध पुतळ्यास उद्धव ठाकरे तर स्वां . वीर .सावरकरांच्या अर्ध पुतळ्यास आदित्य ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. .त्यानंतर ते सावरकर स्मारकाच्या दिशेने मार्गस्थ झाले जातांना मारवाडी गल्लीत माहेश्वरी महिला मंडळ ,झंवर तसेच खर्डे परिवाराच्या वतीने ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले.स्व . विर सावरकर स्मारकात आल्यानंतर त्यांचे सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबईचे ट्रस्टी शैलेंद्र चिखलकर ,सदस्य सुधीर सूर्यवंशी, नरेंद्र बुरघाटे यांनी पुष्गुच्छ देऊन स्वागत केले. स्मारकातील जन्म खोलीतील सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच देव घरातील सावरकरांची कुलस्वामिनी अष्टभुजा भवानी मातेचे दर्शन घेतले.त्यानंतर संपूर्ण ठाकरे परिवाराने स्मारकातील सावरकरांच्या छायाचित्रांची पाहणी केली .त्यांना स्मारकाचे व्यवस्थापक मनोज कुवर आणि भूषण कापसे यांनी माहिती दिली. याप्रसंगी त्यांच्या समावेत मिलिंद नार्वेकर, खासदार संजय राऊत ,सुभाष देसाई खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ,शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील संपर्कप्रमुख संगीता खोडा राजेश गावंड ,अरविंद नेरकर आदींसह शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर ,सुनील बागुल ,सुधाकर बडगुजर, दत्ताजी गायकवाड, डीजी सूर्यवंशी, निवृत्ती जाधव, विलास शिंदे, अनिता करंजकर आदी मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे ज्येष्ठ शिवसैनिक शाम गणोरे, नंदन रहाणे, तसेच स्थानिक शिवसेनेचे शहर प्रमुख विक्रम सोनवणे प्रमोद घुमरे शाम ढगे भाऊसाहेब गायकवाड स्वाती झुटे फरीद शेख नितीन करंजकर मनोहर आंबेकर सोमनाथ आहेर रामदास जुंड्रे संग्राम करंजकर काकासाहेब देशमुख आदिंसह शिवसैनिक उपस्थीत होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!