HomeCrimeसातशे रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक

सातशे रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक

सिन्नरचा भूमी अभिलेख कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात.
सातशे रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी कारवाई.

आलोसे सुर्यभान मुरलीधर निंबाळकर, दप्तरबंद, नेम. उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय, सिन्नर यांनी ७०० रुपये लाचेची रक्कम स्विकारल्याने त्यांचे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
यातील तक्रारदार यांनी भुमी अभिलेख कार्यालय, सिन्नर येथे गट नकाशा व पोट हिस्सा नकाशा मिळणेसाठी अर्ज केलेला होता. त्या संदर्भात ते भुमी अभिलेख कार्यालय, सिन्नर येथे गेले असता आलोसे सुर्यभान मुरलीधर निंबाळकर, दप्तरबंद, नेम. उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय, सिन्नर यांनी तक्रारदार यांचेकडे ७०० रू लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयात याबाबत तक्रार दिली होती.
सदर तक्रारीवरुन ला.प्र.वि. नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा आयोजित केला होता. सापळा कारवाई दरम्यान आलोसे सुर्यभान मुरलीधर निंबाळकर, दप्तरबंद, नेम. उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय, सिन्नर यांनी तक्रारदार यांचे कडे ७०० रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम मंगळवार दि. ३० जानेवारी २०२४ रोजी स्विकारल्याने त्यांना पकडण्यात आले. त्यांचेविरुध्द सिन्नर पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण येथे गुरनं ५७/२०२४, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस अधिक्षक ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक व माधव रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास श्रीमती. वैशाली पाटील, पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि, नाशिक करीत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!