येवले तालुक्यातील नगरसूल येथे पुन्हा नात्याला काळिमा फसणारी घटना घडली आहे.आपल्याच सुनेवर वारंवार बलात्कार करणाऱ्या सासऱ्या विरुद्ध येवला तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कायदा कलम 376 व 498 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजय लक्ष्मण कुडके असे या 55 वर्षीय नराधमाचे नाव असून माझ्या मानसिकतेचे फायदा घेत सासऱ्याने माझ्यावर लैगिक अत्त्याचार व बलात्कार केल्याची फिर्याद सदर 23 वर्षीय विवाहित पीडितेने तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. तसेच इतर घरातील मंडळींनी देखील माझा हुंड्यासाठी छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी पीडितेची शारीरिक चाचणी करून संशयीत आरोपी संजय कुडके यास अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी करीत आहे.