श्र पंचवटी : पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असून त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, हॉस्पिटलच्या माजी पीआरओचा पती राजेंद्र चंद्रकांत मोरे यांने
आर्थिक वादातून जीवघेणा हल्ला केल्याचे पोलीस सांगितले.
डॉ. राठी यांच्याकडे रोहिणी राजेंद्र मोरे या पीआरओ म्हणून काम करीत होत्या. सन 2022 मध्ये डॉ. राठी यांची रोहिणीचा पती राजेंद्र मोरे याच्या माध्यमातून म्हसरूळ परिसरात एका जमिनीचा व्यवहार केला होता. दीड वर्षात डॉ. राठी यांनी मोरे यास अनेक वेळा व्यवहारापोटी पैसे दिले होते. या पैशांसाठी राठी यांनी त्याच्याकडे तगादा लावला होता.
दरम्यान, राठी यांनी रोहिणी मोरे यांना कामावरून काढून टाकले होते. डॉक्टर आपली बाहेर बदनामी करीत आहेत, असा संशय आल्याने राजेंद्र मोरे याच्या मनात डॉक्टरांविषयी प्रचंड राग निर्माण झाला. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास मोरे हा राठी यांच्याशी चर्चा करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता. दोघांमध्ये चर्चा सुरू असताना त्यांचे शाब्दिक वाद झाले. त्यावेळी राठी फोनवर बोलत असतांना मोरे याने कोयत्याने त्यांच्या मानेवर व डोक्यावर सपासप वार केले. हॉस्पिटलचा कर्मचारी आत गेल्यावर राठी कॅबिनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचार्यांनी तत्काळ प्राथमिक उपचार सुरू केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने रात्री राठी यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मोरे हा हल्ल्यानंतर पसार झाला असून, पोलिसांनी घटनास्थळावरून
रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज माध्यमातून शोध सुरू केला आहे. सुयोग हॉस्पिटलचे संचालक राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे समजताच घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन
जाधव, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल झाले होते.
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पीआरओच्या पतीकडून डॉ.कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला
Recent Comments
on Hello world!