Homeताज्या बातम्याशेतकर्‍यांचे कांद्याच्या माळा घालून आंदोलन

शेतकर्‍यांचे कांद्याच्या माळा घालून आंदोलन

नाशिक लोकल वृत्तसेवा
र्ीलासलगाव : नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा पिंपळगाव बसवंत येथे होत आहे. सध्या जिल्ह्यात कांदाप्रश्नी शेतकरी व काही संघटना आक्रमक असल्याने सभास्थळी त्यांच्याकडून निषेध व्यक्त होण्याची शक्यता आहे.त्या पार्श्वभूमीवर लासलगाव येथे आज सकाळी कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे प्रतिनिधी म्हणून जयदत्त होळकर (शरद पवार गट) यांच्या नेतृत्वाखाली कांद्याच्या माळा घालून निर्यातबंदी विरोधात जोरदार घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
दरम्यान लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे व पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हांडळ, पोलीस कर्मचारी सुजित बारगळ यांच्यासह सध्या वेशातील पोलिस कर्मचार्‍यांनी जयदत्त होळकर यांच्यासह सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस कार्यालयात आणले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होईपर्यंत या आंदोलकांना पोलीस कार्यालयातच अटक करून अडकवून ठेवण्यात येईल असे समजते.
या आंदोलनात सहभागी झालेले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, डॉ. सुजित गुंजाळ, शिवसेनेचे शिवा सुराशे, राष्ट्रीय काँग्रेसचे डॉ. विकास चांदर, अफजल शेख, प्रवीण कदम, मधुकर गावडे, विकास रायते, महेश होळकर, संतोष पानगव्हाणे, गोकुळ पाटील, प्रमोद पाटील, भरत होळकर, राहुल शेजवळ, राहुल वाघ, मयूर बोरा यांच्यासह दहा ते बारा जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान लासलगाव पोलीस कार्यालयाने मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेणार्‍या शहर विकास समितीचे काही कार्यकर्ते आणि परिसरातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांना प्रतिबंधात्मक नोटीसा दिल्याची माहिती हाती आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!