Homeताज्या बातम्याजिल्ह्यात पाच लाख हेक्टरवर होणार खरीपाच्या पेरण्या

जिल्ह्यात पाच लाख हेक्टरवर होणार खरीपाच्या पेरण्या

नाशिक लोकल वृत्तसेवा
र्ीनाशिक : आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकरी सज्ज झाले असून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानेही बियाणे तसेच रासायनिक खतांची मुबलक उपलब्धता करून घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. जिल्ह्यात एकूण पाच लाख 6,700 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्या प्रस्तावित असून त्यादृष्टिने नियोजन सुुरू आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण सर्वसाधारण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यातच मान्सून काही दिवसातच अंदमानमध्ये धडकणार असल्याचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन जिल्ह्यातील शेतकर्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला सुरूवात केली आहे. मशागतीची लगबग सुरू आहे. पाच लाख 6,700 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांच्या पेरण्या होतील, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
संकरित ज्वारीचे क्षेत्र 600 हेक्टर इतके प्रस्तावित करण्यात आले आहे. तर संकरित बाजरीचे क्षेत्र 51,850 हेक्टर इतके आहे. सुधारित बाजरीचे क्षेत्र 9,150 हेक्टर इतके प्रस्तावित करण्यात आले आहे. तर 94 हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सर्वाधिक म्हणजे दोन लाख 42 हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
नागलीचे 16 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. तर पाच हजार हेक्टर क्षेत्रावर तूर पेरली जाईल, असाही अंदाज आहे. मूगाचे क्षेत्र 18 हजार हेक्टर प्रस्तावित आहे. तर भुईमूगाचे क्षेत्र 23 हजार हेक्टर प्रस्तावित करण्यात आले आहे.

बियाणांची मागणी
खरीप हंगामातील विविध पिकांची पाच लाख 6,700 हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज बांधून त्यानुसार बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहे. 71,243 क्विंटल बियाणांची गरज आहे. तर 5,851 क्विंटल मोफत बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षात सरासरी 66,548 क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे.

रासायनिक खतांची मागणी
बियाणांप्रमाणे रासायनिक खतांचीही मागणी नोंदविण्यात आली आहे. संपूर्ण खरीप हंगामासाठी दोन लाख 60 मेट्रिक टन खतांची मागणी नोंदविण्यात आली. प्रत्यक्षात मात्र दोन लाख 20,600 मेट्रिक टन साठा मंजूर झाला आहे. युरिया एक लाख मेट्रिक, एमओपी पाच हजार मेट्रिक टन,डिएपी 26 हजार मेट्रिक टन, एसएसपी 31 मेट्रिक टन याप्रमाणे मागणी नोंदविण्यात आली आहे. मागणी नोंदविण्यात आलेल्या खतांमध्ये संयुक्त खतांचाही समावेश आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!