Homeताज्या बातम्याप्रचाराची सांगता; प्रशासन सज्ज

प्रचाराची सांगता; प्रशासन सज्ज

नाशिक लोकल वृत्तसेवा
नाशिक : लोकसभेच्या नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघासाठी जाहीर प्रचाराची सांगता झाली असून येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून यंत्रांना सज्ज झाली आहे.
दिंडोरी मतदार संघात एकूण दहा उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 18 लाख 53 ,387 उमेदवार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. त्यासाठी एकूण 1922 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्र अध्यक्ष म्हणून 2134 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तितकेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत राहणार आहेत. इतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून 1929 पुरुष आणि 205 महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक मतदारसंघात 31 उमेदवार रिंगणात आहेत. 1910 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून 20 लाख 30,124 मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. मतदान केंद्र अध्यक्ष म्हणून 2090 पुरुष आणि 33 महिला कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तितकेच केंद्र स्तरीय अधिकारी आहेत.इतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून 1559 पुरुष आणि 564 महिला कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 509 बस आणि 1374 इतर वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही मतदार संघासाठी 22 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिंडोरी मतदार संघात 44 तर नाशिक मतदारसंघात 38 स्थायी पथके राहणार आहेत. दोन्ही मतदारसंघात 12 चलचित्र सर्वेक्षण पथके राहणार आहेत. तर प्रत्येकी सहा चलचित्र निरीक्षण पथकेही राहणार आहेत. अंतर जिल्हा तपासणी नाके एकूण अकरा आहेत. तर पाच अंतर राज्य तपासणी नाके आहेत. दिंडोरी मतदार संघासाठी विनिता पेगू ह्या मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून कार्यरत राहणार आहेत. नाशिक मतदारसंघासाठी पी एस प्रद्युम्न यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!