नाशिक लोकल वृत्तसेवा
इगतपुरी : जनता जनार्दनाने सन. 2014 मध्ये काँग्रेस चोर आहे म्हणून भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणले. मात्र भाजपाने देखील तेच काम केले. ईडी, इन्कम टॅक्सच्या आधारे भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत काळा पैसा आला आहे. उद्या जर दोन्ही सेना एक झाल्या तर एक सेना मोदींच्या डाव्या बाजूला तर दुसरी सेना उजव्या बाजूला असणार आहे. आज जरी उद्धव ठाकरे यांना मतदान केले तर मोदींनाच होणार आहे. तर उद्धव ठाकरे वर्षभरापासून गद्दारी केली असे तेच तेच ऐकत आहोत. काही तरी दुसरं तरी सांगा असा नवीन टोला यावेळी वंचितचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी लगवला आहे. घोटी टोलनाक्यावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांच्या प्रचारासाठी आले त्यावेळी आंबेडकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष पवन पवार, उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, दिल्लीच्या शेतकर्यांनी वर्षभर आंदोलन केले तरी देखील हमी भाव मिळाला नाही. त्यासाठी वंचित सतेत आली तर हमीभाव करणारच असे ते म्हणाले भारतीय जनता पक्षाला सत्तेतून उखडून काढले तरच देशात परिवर्तन होईल. भारतीय रेल्वे ही लोकांची रेल्वे होती मात्र आता ती येणार्या पाच वर्षात अडाणी अंबानी यांची झाल्या शिवाय राहणार नाही. मोदी पंतप्रधान झाले तेव्हा देशाचे सरासरी 24 रुपयांचे कर्ज 84 रुपये केले आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात देशाचं कर्ज 100 रुपये होणार आहे. मोदींनी आता सरकारी कंपन्या विकायला सुरुवात केली आहे. आर्थिक कणा मजबूत असावा म्हणून जुन्या पिढीने कंपन्या सरकारी ठेवल्या होत्या असा आरोप यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सर्वोसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी केला. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईडी, आयटीच्या आधारे भाजपकडे काळा पैसा आला : आंबेडकर
RELATED ARTICLES
Recent Comments
on Hello world!