आंतरजातीय व अंतरधर्मीय विवाह करणाऱ्या दांपत्यांसाठी नाशिक पोलीस आयुक्तालय अंतर्गत आंतरजातीय अंतर धर्मीय जोडप्यांना सुरक्षा पुरवण्याच्या अनुषंगाने विशेष कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या सेंटर क्राईम ब्रांचने दिले आ 2010 च्या शक्ती वाहिनी विरुद्ध भारत सरकार या याचीका क्रमांक 231/ 2010 याचिकेतील दिशा निर्देशाचे अनुपालन करणे माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी याचिकेच्या अनुषंगाने आदेश दिले आहेत. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आवश्यकतेप्रमाणे सुरक्षा पुरविणे त्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्याच्या अनुषंगाने विशेष कक्ष स्थापन करणे बाबतचे आदेश दिले आहेत आंतरजातीय किंवा अंतर धर्मीय विवाह केल्यामुळे अशा जोडप्यांना त्यांच्या लग्नाला विरोध करणाऱ्या सामाजिक घटकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणे व त्यांना योग्य सुरक्षा करून याबाबत सदर याचिकेच्या निकालात माननीय न्यायालयाने वहापोह केला आहे माननीय न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या अनुषंगाने नाशिक शहर पोलीस आयुक्तालय स्तरावर मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरजातीय किंवा अंतर धर्मीय विवाह केल्यामुळे विवाहित जोडप्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी पोलीस उपायुक्त गंगापूर रोड कार्यालय नाशिक येथे कक्ष स्थापन करण्यात आला आहे आपण करण्यात आलेल्या कक्षामध्ये माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर हे अध्यक्ष असून माननीय जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे सदस्य आहेत व जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी हे सदस्य सचिव आहेत आंतरजातीय विवाह आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे विवाहित जोडप्यास कोणाविरुद्ध तक्रार असल्यास त्यांनी तत्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अंतरजातीय व अंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना न्यायालयाचा दिलासा.
RELATED ARTICLES
Recent Comments
on Hello world!