HomeCrimeअण्णा हे वागणं बरं नव्हं.

अण्णा हे वागणं बरं नव्हं.

नाशिक लोकल : प्रतिनीधी

भोळ्या अंध भक्ता आता तरी जागा हो, , आता या प्रोडक्शन प्रस्तुत चित्रपटाची कहाणी तर दाम करी काम वासना अशी बनली आहे . अशा मथळ्याखाली कथाही प्रसिद्ध झाली अनेकांनी ती पाहिली त्यांच्या पायाखालची मातीच सरली, मग देव हे असं काय केलं माझ्या गुरूने,

हा कसला २०२४ मधला गुरू, हा तर नारधमच, मात्र यातील खरा व्हिलन कोण आहेत हे अद्याप जनतेस आणि भक्तांना कळलेले नाही, या भोंदू ची ख्याती सांगणे अजून शक्य नाही.

मात्र प्रोडक्शन हाऊस व कथा खरी आहे, हे गण गण गणात बोते सांगू शकतील. ही सत्यपरिस्थिती आहे. आध्यात्मिक गुरु आणि साधक महिलेचा कार्यकाळ 2023 मधील होता त्या दीपावली उत्सवात बरेच काही घडले . एकीकडे दीपावलीची धामधूम सुरू होती. तर दुसरीकडे एक महिला आपली अब्रु कशी लुटली हे पोलिसांना सांगत होती.

हेच नव्हे तर अनेक महिलांना आपले भक्ष ह्या नराधमाने केले हे समजले म्हणून ती अजून संतापली, गुरु ने तर वासणेचेच केन्द्र उपभोग करण्याचे चालू केले हे तिला समजले.

महिला आध्यात्मिक गुरुची साधक होती. सदरील महिला ही सरकारी अधिकारी असून उच्च पदावर कार्यरत होती.

बाबागिरी ,खोट्या पूजा घालण्याचे वेड लागले की माणूस त्यात वाहत जातो, यात शंका नाही तशीच महिलाही प्रवाहात वाहत गेली आणि अध्यात्म गुरूंची शिकार झाली.

गुरु शिष्याचे नाते संपून ती अनेक वेळा वासनेची शिकार झाली. अण्णा गुरुजींनी सदर साधिकेला संपूर्ण आपल्या जाळ्यात ओढले लग्नाचें आश्वासन देत वेळ काढून नेली , तब्बल नऊ वर्ष या महिलेचा उपभोग अण्णांनी घेतला. या संपूर्ण परिक्रमेला महिला वैतागली होती या जाळ्यातून सुटायचे की जाळ्यात अडकत जायचे असे प्रश्न तिला सतावू लागला.

साधक महिलेला एका मैत्रिणींनी सल्ला देत ह्या रास लीलेच्या कृत्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सांगितले.

या व्हिडिओत साधक महिला व अण्णा गुरुजी यांची मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग झाले.

कुठलाही वेळ न दवडता पीडित महिलेने या रेकॉर्डिंगचे कथन थेट पोलिसात केले.

अण्णा गुरूंजी विरुद्ध फिर्यात तीने पोलिसात दाखल केली.

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा हा गुन्हा नोंद करण्यास सांगितला.

मात्र पोलिसात तसा गुन्हा दाखल झाला नाही साधक महिलेचा फक्त अर्जच स्वीकारण्यात आला .

तिथून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि धावपळ उडाली.

बलाढ्य संपत्ती असलेला अण्णा , गुरू म्हंटल्यावर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटले, पैश्यांची लालसा तयार झाली . मग काय नवीन खेळ चालू झाला .

या प्रकरणात थेट पोलीस आयुक्त उपायुक्त पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी महिलेवर दबाव आणून गुन्हा दाखल न करण्याच्या योजना करु लागलें. . कसं बसं, पोलीस यंत्रणेने साधक महिलेला विनवणी करून पैसे घेण्यास भाग पाडले.

मात्र ते सर्व षडयंत्र होते त्या महिलेला 51 कोटींच्या रुपयांच्या खंडणीत अडकवण्याचा घाट होता, . सदर खंडणीत साधक महिलेचा भाऊ व तिचा मुलगा यांच्यावरही पोलिसात खंडणीचे गुन्हे दाखल केले आणि सर्व प्लॅन करणाऱ्यांचा विजय झाला .पीडित महिला सेंट्रल जेलमध्ये खोट्या गुन्ह्यात टाकून दिली .

प्रकरण इथेच शांत होत नाही तर जिल्ह्यातील मीडिया नेते राजकीय मंडळी काही धर्मांड संघटनांचे नेते मध्यस्ती करुन पैसे कमावून घेतात.यांना वाटप करत रक्कम ठरवली जाते. 2024 च्या दिवाळीनंतर दोन दिवसांनी सदर रक्कम ही प्रत्येकाच्या स्तरावर वाटप करण्यात येते. पुढे जात याचा गावगावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांच्या पर्यंत जाऊन पोहोचतो.

हा प्रकार अगदी केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत जाऊन पोहोचतो आणि तेथे मोठी सेटलमेंट तोडी होते. साधक महिला तिचा भाऊ व मुलगा सेंट्रल जेलमध्ये असतानाच ही विल्हेवाट नराधम अण्णांचे व त्यांचें कार्यकर्ते करतात. सदर प्रकरणातील पीडित महिला ही कारागृहाच्या बाहेर सद्या आहे. तिच्यावर मोठा राजकीय आणि शासकीय दबाव असल्यामुळे ती या प्रकरणातून दबावापोटी आणि भीती पोटी नराधम गुरू अण्णा विषयी काहीही बोलण्यास तयार होइल असे वाटत नाही. पण आता ह्या पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आता पत्रकार व पत्रकारांचे संघ पुढे येणार आहेत. या प्रकरणाच्या मागे पत्रकारांनी चांगलीच कंबर कसली असून आरोपी गुरू अन्नाची आता वाट लागणार आहे.पर्दाफाश तर चित्रपटातून होईलच त्याचं बरोबर, कथेतून देखिल होईल हे मात्र नक्की.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!