Homeनाशिक लोकलहा पूर्ण विराम नाही तर केवळ स्वल्प विराम आहे; बारमाही पाण्यासाठी आपलं...

हा पूर्ण विराम नाही तर केवळ स्वल्प विराम आहे; बारमाही पाण्यासाठी आपलं काम अविरत सुरू राहील – मंत्री छगन भुजबळ

नाशिक लोकल प्रतिनीधी  :-

मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी आज येवल्यातील डोंगरगाव येथील साठवण तलावात प्रवाहित झाले आहे. येवलेवासियांना दिलेल्या शब्दाची स्वप्नपूर्ती झाल्याचा मनस्वी आंनद असून यापुढील काळातही पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही तसेच मांजरपाडा प्रकल्प केवळ पूर पाण्यावर थांबणार नाही तर पार-गोदावरी उपसा जोड योजना क्र. ३ व ४ च्यार माध्यमातून पार खो-यातील पश्चिमेकडे वाहून जाणारे ५०० मीटर पर्यंतच्या लेवलचे ५ टी.एम.सी. पाणी लिफ्ट करुन आपण मांजरपाडा मध्ये आणणार आहोत. हे पाणी पूणेगांव दरसवाडी मार्गे येवल्याला आणणार असून येवल्याची तहान भागून आपण वैजापूर , संभाजीनगरला सुद्धा पाणी देणार आहोत असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मांजरपाडा प्रकल्पातील पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे साठवण तलावात आलेल्या पाण्याचे जलपूजन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले . त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बाबासाहेब गाढवे, माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ, अॅड. रविंद्र पगार, अंबादास बनकर, सविता पवार,राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, अरुण थोरात, प्रेरणा बलकवडे, वसंतराव पवार, साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, ज्ञानेश्वर शेवाळे, डी. के. जगताप, हुसेन शेख, राजश्री पहिलवान, भाऊसाहेब बोचरे, मोहन शेलार, किसनराव धनगे,  संतु पा. झांबरे, डॉ. श्रीकांत आवारे, बाळासाहेब पिंपरकर, बाळासाहेब गुंड, दत्तुपंत डुकरे, दत्तकाका रायते, दिपक लोणारी, निसार शेख, राजेश भांडगे, अमजद शेख, मंगेश गवळी, प्रा. अर्जून कोकाटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ आपले मनोगतात म्हणाले, या योजनेचा DPR सुद्धा तयार झाला असून,मेरीच्या SLTAC कमिटीच्या  मान्यतेनंतर DPR शासनाकडे मंजुरीसाठी येणार आहे.  आगामी काळात आपण दरसवाडी धरणाची क्षमता सुद्धा वाढवणार आहोत. पुणेगांवमध्ये आणखीनही कुठून पाणी शकतो याबाबत जलसंपदा विभागाचे सचिव आणि नरहरी झिरवाळांसोबत चर्चा सुद्धा झाली आहे. मांजरपाडा-गुगुळ या प्रवाही वळण योजना राबवून या वळण योजनांचे पाणी पुणेगांव मध्ये आणण्यांसाठी सर्वेक्षण करुन DPR तयार करण्याणच्या सुचना दिलेल्या आहेत.

दुष्काळाच्या छायेत असलेल्या येवल्याला कुठल्याही परिस्थिती पाणी आणण्याचे असा निश्चय आपण केला होता. येवलेकराना पाणी आणण्याचा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आपण चंग बांधला होता. आज अनेक अडचणींवर मात करत डोंगरगावमध्ये पाणी दाखल झालं असून दिलेला शब्द पूर्ण केला आहे. यापुढील काळातही अधिक आपले हे काम सुरू राहील.येवला तालुक्यातील प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी लवकरच उपलब्ध होईल. यासाठी अनेक योजना प्रगतीपथावर असून लवकरच या योजना पूर्ण होऊन पाणी उपलब्ध होईल असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.
२००६ साली झालेला कालवा २०१९ पर्यंत पडीक असल्याने अनेक अडचणी होत्या, कालव्याची दुरवस्था झालेली होती. यासंदर्भात तज्ज्ञ मंडळी व प्रशासनाची बैठक घेतल्यानंतर कालव्याचे नव्याने विस्तारीकरण व अस्तरीकरण करण्याची गरज समोर आली. दरसवाडी-डोंगरगाव कालव्याचे काँक्रीटीकरण व अस्तरीकरणासाठी २४२ कोटींचा निधी मंजूर करून घेतला. या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात आली. काम वेगाने होण्यासाठी कालव्यावर प्रत्येक २० किमी अंतरावर आधुनिक यंत्रांद्वारे काम हे काम सुरू होते. या अथक प्रयत्नानंतर दीड वर्षांची मुदत असलेले हे काम अवघ्या ६ महिन्यांत जवळपास ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले. मांजरपाडा पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरूवात झाली आहे बोगद्याद्वारे पुणेगाव धरणात आवक सुरू झाली. पुनेगाव व दरसवाडी धरण भरून पाणी येवल्याच्या हद्दीत दाखल झाले.
, येवला तालुक्यातील पूर्व भागासोबतच चांदवड तालुक्याला देखील या पाण्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. येवलेकरांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान असल्याच्या भावना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी भावूक होत व्यक्त केल्या. येवलेकरांनी माझ्यावर दाखवलेल्या विशेष प्रेमामुळे या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकास कामे करू शकलो. यापुढेही विकासाची ही कामे अविरत सुरु राहतील असा विश्वास यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.
ते म्हणाले की, इतक्या वर्ष माय माऊलीचे अश्रू पुसण्यासाठी आजचा दिवस आहे. यात कुठलाही राजकारण नाही. या आनंदाच्या क्षणात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे, बाजार समितीच्या सभापती सविता पवार, लक्ष्मण कदम यांनी मनोगत व्यक्त केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!