पुणे: राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसावेत यासाठी भाजपकडून सुद्धा देव पाण्यात ठेवण्यात आले आहेत. पुण्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून सारसबाग गणपतीला होम हवन आणि आरती करण्यात येत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या सह कार्यकर्त्यांकडून गणपती बाप्पाची आरती केली. राज्यात भाजप महायुतीमध्ये सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना करण्यात आली.” पुन्हा या पुन्हा या देवेंद्रजी पुन्हा या” म्हणत भाजप कार्यकर्त्यांकडून पुण्यात होम हवन करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांची देखील होम हवनला हजेरी लावली.
मुख्यमंत्री पदासाठी पुण्यात होम हवन.
RELATED ARTICLES
Recent Comments
on Hello world!