Homeनाशिक महानगरपालिकानासिक महानगरपालिकेने घरपट्टीत 50% सूट द्यावी -चंदन पवार

नासिक महानगरपालिकेने घरपट्टीत 50% सूट द्यावी -चंदन पवार

नाशिक: नासिक महानगरपालिकेने घरपट्टीवरील दंडात 95% सूट तर दिलीच आहे, परंतु मूळ रकमेतही 50% सूट द्यावी कारण अनेक महिन्यांपासून ज्या नाशिककरांची घरपट्टी थकलेली आहे व त्यावर नाशिक महानगरपालिकेकडून अनेक पटीने दंड लावण्यात आला होता त्या दंडावर महानगरपालिकेने सूचना काढून दिलेल्या वेळेत जर घरपट्टी भरली तर दंडात 95% सूट देऊन रक्कम भरण्यासाठी आवाहन केले होते. नाशिकमध्ये अनेक असे मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आहेत ज्यांची मूळ रक्कमच खूप मोठी आहे, अशा दुर्बल घटकातील आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी महानगरपालिकेने मूळ घरपट्टीच्या रकमेत 50% सवलत देऊन गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना पूर्ण घरपट्टी भरण्यास प्रोत्साहित करावे असे जर केले तर जवळपास 99% लोक घरपट्टी तात्काळ भरतील जेणेकरून महानगरपालिकेची संपूर्ण वसुली होईल आणि महानगरपालिकेचे उत्पन्न सुद्धा वाढेल, तसेच पाणी पट्टीमध्ये सुद्धा महानगरपालिकेने भरघोस सूट देऊन लोकांना आर्थिक विवेचनेतून बाहेर काढावे अशी विनंती वजा मागणी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांना पत्राद्वारे भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चंदन पवार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!