Homeनाशिक लोकलजिल्ह्यात १६ भरारी पथक तैनात 

जिल्ह्यात १६ भरारी पथक तैनात 

जिल्ह्यात १६ भरारी पथक तैनात

खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा वेळेवर गुणवत्तापूर्ण उपलब्ध व्हाव्यात म्हणून कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात बोगस खते / बियाण्याची विक्री होऊ नये या करिता जिल्हास्तरावर १ व प्रत्येक तालुकास्तरावर १ असे एकूण १६ भरारी पथके तयार केलेली असून या पथकांमार्फत बोगस खते / बियाणे विक्री ला आळा घालण्यात येणार आहे, जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी मुबलक प्रमाणात बियाणे आणि खते शेतकऱ्यांना कशी मिळतील यासाठी तालुकास्तरावर सूक्ष्म नियोजन केले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करताना कोणी आढळल्यास भरारी पथकाच्या माध्यमातून अचानक धाडी घालून वेळोवेळी तपासण्या केल्या जातील त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, सक्तीची कृषी निविष्ठा ची लिंकिंग शेतकर्यांना केल्यास तत्काळ कायदेशीर कार्यवाही करण्याची सूचना मा.जिल्हाधिकारी महोदय नाशिक यांनी दिली. शेतकरी बांधवाना आवाहन करण्यात येते कि कोणत्याही खताबरोबर लिंकिंग केल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा, श्री. संजय शेवाळे, कृषी विकास अधिकारी जि.प. नाशिक -९४२२२२४४५१, श्री. दीपक सोमवंशी, मोहीम अधिकारी, जि.प. नाशिक ९९७५४३४४१८, डॉ. जगन सूर्यवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नाशिक ९४०३५४६३३८, श्री. श्याम पाटील, तंत्र सहायक ( परवाना) नाशिक ९४२०१७८८८६ संपर्क करावा व व्हाट्सअॅप दुवारे नाशिक -७८२१०३२४०८ व राज्य- ९८२२४४६६५५ एसएमएस करावे तसेच जिल्ह्यात मुबलक प्रमाणात बियाणे आणि खत उपलब्ध होतील आज रोजी ११०३३१ मेट्रिक टन खत व ९७५९९ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे अशी माहिती मा.श्री. अभिमन्यू काशीद, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नाशिक यांनी दिली.तालुकास्तरावर एक तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. कृषी अधिकारी, पंचायत समिती हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. खरीप हंगामात बोगस खते/ बियाणे विक्री होऊ नये या करिता भरारी पथका मार्फत बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यात येणार आहे, यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल आणि अनधिकृतरित्या विक्री होणाऱ्या बोगस बियाणे व खते विक्रीला लगाम घालण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!