HomeCrimeबनावट अनुदानीत खतांचा पुरवठा करणाऱ्या पासून सावधान.

बनावट अनुदानीत खतांचा पुरवठा करणाऱ्या पासून सावधान.

बनावट 10.26.26 या खताबाबत हरसुल पोलीस ठाणे, तालुका त्र्यंबकेश्वर येथे गुन्हा दाखल.

जिल्हास्तरावर कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद यांचे अध्यक्षतेखाली शासनाने भरारी पथक तयार केले आहेत. सदर भरारी पथकातील सदस्य डॉ जगन सुर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जिअकृअ कार्यालय नाशिक यांना दिनांक 15/07/2025 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मौजे हरसुल तालुका त्र्यंबकेश्वर येथे बनावट खतसाठा विक्री साठी हरसुल येथे येणार असल्याचे कळले. त्यानंतर भरारी पथक प्रमुख श्री संजय शेवाळे कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, श्री.जगन सुर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जिअकृअ नाशिक, श्री.कल्याण पाटील, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, श्री रामा दिघे कृषि अधिकारी (गुनि), तालुका कृषि अधिकारी कार्यालय त्र्यंबकेश्वर व पोलिस उपनिरीक्षक श्री मोहित मोरे व इतर पोलिस कर्मचारी यांचे सहाय्याने दिनांक 15/07/2025 रोजी हरसुल येथे आयशर कंपनीचे संशयीत वाहन क्रमांक MH15 FV7717 पकडण्यात आले. सदर वाहन पोलिस ठाणे हरसुल येथे नेऊन त्याची तपासणी केल्यानंतर त्यात झुआरी अग्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीचे 10.26.26 या खताच्या डुप्लिकेट 240 बॅगा आढळुन आल्या. सदर खताची अंदाजे किंमत 3.30 लाख रुपये इतकी आहे. सदरील वाहन व जप्त करण्यात आलेले खत असा एकूण 15.30 एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर बाबतीत प्राथमिक शहानिशा करून पकडलेल्या खताचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविण्यात आला आहे. सदर प्रकरणी हरसुल पोलिस ठाण्यात संबंधीतांविरुध्द गुन्हा क्रमांक 0160 दिनांक 15/07/2025 दाखल करण्यात आला आहे. सदर कामकाजात श्री सुभाष काटकर, विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग नाशिक व श्री. अभिमन्यु काशिद, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. तसेच घरपोच मिळणारी अनुदानित खते शेतक-यांनी खरेदी करु नये, खतांच्या बॅग खरेदी करताना सिलबंद तसेच त्यावरील माहिती कायद्यानुसार आहे हे पाहुन घ्यावे आणि कृषि निविष्ठा या अधिकृत विक्रेत्यांकडुन व पक्कया बिलात पॉस मशीनवरूनच खरेदी करण्याचे आवाहन श्री सुभाष काटकर विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी विभागातील शेतक-यांना केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!