HomeCrimeसावकारी च्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या कैलासला केली पोलिसांनी अटक

सावकारी च्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या कैलासला केली पोलिसांनी अटक

अवैध सावकारी चा धंदा करून अमाप माया जमवणारा कैलास मैंद याला उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कैलास मैंद या संशयीत आरोपीच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात अडीच लाखाची खंडणी मागितल्य प्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे. उपनगर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित आरोपी कैलास मैंद याची काय पार्श्वभूमी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कैलास महिने याच्यावर 2010 मध्ये पुणे येथील लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये 420, 406 नुसार गुन्हा दाखल आहे तर खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर येथे 420 , 406 नुसार गुन्हा दाखल आहे नाशिक येथील उपनगर पोलीस स्टेशन मध्ये 2018 मध्ये 384, 396, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे तर 2025 मध्ये उपनगर पोलीस स्टेशन येथे सावकारी अधिनियमानुसार 23, 2,9 42 ,45 नुसार गुन्हा दाखल आहे 2025 मध्ये 137/2,,352, 351/ ,3/5  व महाराष्ट्र सावकारी अधिनियम 39 45 प्रमाणे गुन्हा दाखल तर 2025 मध्ये उपनगर पोलीस स्टेशन येथे 140/2, 308/ 4, 115/2,  335 , 351/1, 3/5   सावकारी कायद्यानुसार 39 , 45 सह 3/5 तर 2025 मध्ये उपनगर पोलीस स्टेशन येथे ३०८/४३०८ ऑब्लिक पाच 308/4,308/5 3/5  प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सर्व गुन्ह्यांवरून कैलास मैंद हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नाशिक शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच असून संशयित कैलास मैंद यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. कैलास मैंद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. उपनगर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित आरोपी कैलास मैंद याची काय पार्श्वभूमी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कैलास महिने याच्यावर 2010 मध्ये पुणे येथील

महिला आणि अन्य कर्जदारांकडून सातत्य. ने खंडणीची मागणी करत असल्याचा आरोप मैंद यांच्यावर असून उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता. हेमंत कृष्णा कापसे, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैलास मैंद, संतोष कुशारे फरान सैय्यद यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कापसे यांनी कैलास मैंद यांच्याकडून त्यांचे हरिविहार सोसायटी शेलार मळा, शिवाजी नगर जेलरोड नाशिक येथील कार्यालयात जावुन व्याजाने घेतलेल्या पैशांच्या बदल्यात यांच्याकडुन 2 लाख 75 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.

कापसे यांनी त्याला सदर पैसे न दिल्यास त्याने फिर्यादी यांच्या परिवारास व फिर्यादी यांना संपवुन टाकण्याची धमकी देवुन फिर्यादी यांचेकडुन सप्टेंबर 2022 मध्ये 50,000/- रू. बळजबरीने घेतले. तसेच इतर आरोपी कापसे यांना फोन करून परिवारास संपवुन टाकण्याची धमकी देवुन फिर्यादी कडे 2,75,000 /- रुपयांची खंडणी मागीतली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संशयित मैंद यांना एक दिवसीय पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून अटक केल्यानंतर मैंद कडून देखील नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असा उच्चार करण्यात आला. कैलास मैंद आणि सुरेश कुशारे यांच्यावर यापूर्वी पोलिस ठाण्यात इतर गुन्हा दाखल आहेत. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!