नाशिक लोकल प्रतिनिधी : महानगर पत्रकार परिषद संस्थेची सन २०२६ साठी सुरुवातीच्या तीन महिन्यांची प्राथमिक कार्यकारणी संस्थेचे अध्यक्ष करणसिंग रामसिंग बावरी यांनी जाहीर केली.
ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल शहा, प्रा. श्रीकांत सोनवणे, प्रियदर्शन टांकसाळे, जयंत महाजन, अनिल वैद्य, सुधीर कुलकर्णी, नरेंद्र जोशी, अभय ओझरकर, सुधीर उमराळकर, हरिभाऊ सोनवणे, हर्षवर्धन बोराडे, ॲड. ज्ञानेश्वर आंधळे, दत्ता शिंदे व डॉ. प्रज्ञा पाटील या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थापक अध्यक्ष दिनेश पंत ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
कार्याध्यक्ष पदी लियाकत पठाण व संजय परदेशी, उपाध्यक्ष पदी विकास बाविस्कर व रोशन गव्हाणे, सचिव पदी सुरेश पिंगळे व खान नजमुल इस्लाम, तर खजिनदारपदी पंकज पाटील व अमित कबाडे यांची निवड करण्यात आली आहे.
संघटक पदावर भाऊसाहेब बोराडे व विश्वास लचके, समन्वयक पदी गिरीश जोशी व चंद्रकांत धात्रक, प्रसिद्धी प्रमुख म्हणून दिनेश भागवत व दिनेश पगारे, तर कार्यालय प्रमुख पदावर योगेश रोकडे व भैय्यासाहेब कटारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारणी सदस्य पदावर धनंजय बोडके, चंद्रशेखर गोसावी, संकेत भंगाळे, संदीप नगरकर, वखार खान, तोसिफ शेख, नरेंद्र दंडगव्हाळ, प्रदीप जगताप, ज्ञानेश्वर तुपसुंदर, भगवान थोरात, सुनील मणियार, विजय बागुल, गौतम संचेती, हेमंत काळमेख, सचिन गायकवाड, संतोष भावसार, विक्रम भास्कर, उल्हास शिरसाट, प्रकाश जोशी, अमोल लिंगायत, डॉ. राकेश श्रीवंश, शमशाद पठाण, पियुष जोशी, संतोष लचके, सलीम खान व स्वप्निल बागुल यांचा समावेश आहे.
नवीन कार्यकारणीच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांसाठी, संघटन मजबूत करण्यासाठी आणि पत्रकारितेचा दर्जा उंचावण्यासाठी कार्यशाळा सह ठोस पाऊले उचलली जाईल, असा विश्वास अध्यक्ष करणसिंग बावरी यांनी व्यक्त केला.