*दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील समस्या गंभीर.
दिंडोरी ( ) दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन शासकीय व निमशासकीय अनेक समस्या भेडसावत आहेत. शासकीय काम आणि ६/१२ महिने थांब अशा प्रकारे अनेक हेलपाटे मारूनही अगदी शुल्लक,छोटी मोठी कामे होत नसल्याच्या तक्रारी सर्वसामान्य नागरिक करत आहे. याला कारण लोकप्रतिनिधींची राजकिय उदासीनता व सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करणे हे आहे असा सुर या मतदार संघातील नागरिक करत आहे. या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी महायुतीच्या बरोबर सत्तेत आहे व मंत्री पण आहेत.पण या मतदारसंघातील आमदार मंत्रीमहोदय राजकारण करतात की त्यांच्या नावाने त्यांचे नातेवाईक व चेले पिले राजकारणाचा धंदा करत आहे हा प्रश्न पडतो.
या मतदार संघात सर्वसामान्यांना वालीच राहिला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे असे सर्वत्र बोलले जाते. सर्वसामान्य नागरिकांना एखाद्या छोट्या छोट्या कामासाठी अनेक वेळा शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. थोडक्यात केवळ राजकीय उदासीनता व सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक असा प्रकार सुरू आहे. लोकप्रतिनिधी,त्यांचे नातेवाईक व चेलेचपाटे व काही ठराविक पंटर लोक या ठिकाणी चुकीचे राजकारण करत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.अनेक शासकीय तक्रारीबाबत उपाययोजना करण्याऐवजी भीक नको पण कुत्र आवर अशी म्हणण्याची वेळ आली आहे.तथापि याबाबत भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांना विचारले असता त्यांनीही यात तथ्य असल्याचे सांगितले आहे. महायुती म्हणून सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींनी याबाबत गंभीरपणे विचार करावा व शासकीय व निमशासकीय कामे सहजसुलभ कशी होतील ते पहावे असे केदार यांनी म्हटले आहे.