नाशिक रोड च्या गोरेवाडी परिसरात गावगुंड दहशत माजवीत असून या दहशतीला एका नगरसेवकाचा हात असल्याचे बोललं जात आहे. गोरेवाडीतील शास्त्रीनगर परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते संदीप शंकरराव काकलिज हे वंचित बहुजन आघाडी पक्षाचे काम करीत असून या परिसरातून इच्छुक उमेदवार म्हणून उमेदवारी करणार आहेत. मात्र काही समाजकंटकांना संदीप काकलिज यांची उमेदवारी मान्य नसल्याने त्यांच्या घरावर अज्ञात संशयतानी हल्ला करणे शिवीगाळ करणे रस्त्यात अडवून दम देणे अशा अनेक घटना घडत आहेत. सदरचा प्रकार संदीप काकलिज यांच्या सोबतच नाही तर इतर राजकीय नेत्यांसोबतही अशाच प्रकारच्या घटना घडत असल्याचे परिसरातील नागरिक सागतात रविवारी (दि १२) म्हणजेच १२ मार्च 2023 रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास संदीप काकडी यांच्या घरावर संशयित
छकुल्या वाघमारे रा. गायकवाड मळा नाशिक रोड व त्याच्यासोबत दोन अनोळखी साथीदारां नी संदीप काकलिज यांच्या घरावर तलवार कोयत्याने हल्ला करीत दहशत माजवत घराच्या खिडकीच्या काचा फोडून मोटर सायकलचे नुकसान करून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस स्टेशन पुढील तपास करीत असून संशयित आरोपी अद्याप मिळून आलेले नाही. यासंदर्भात संदीप काकलिज व गोरेवाडी परिसरातील नागरिकांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट भेट घेऊन निवेदन दिले .
संदीप काकलिज यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
त्यावेळी परिसरातील आरपीआयचे ज्येष्ठ नेते सुनील कांबळे ,माजी नगरसेवक हरीश भडांगे ,संजय साबळे, सूर्यकांत भालेराव, किशोर जाधव, परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले की लवकरात लवकर संशयित आरोपींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले