सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बाहेर ठेकेदारांचे ठिय्या आंदोलन
नाशिक : शहर
बिल्डर्स असोसिएशन आँफ इंडिया व ठेकेदार कृती समिती बांधकाम विभागा दालनाबाहेर ठिय्या आंदोलन बुधवारी (दि २९) करण्यात आले. मागील दोन ते तीन वर्षा पासुन बिल मंजुर झालेले आहेत. १.५०५४ (०३) १७२ .५८ कोटी
२.५०५४ (०४) ३६३.४९ कोटी ३.३०५४ विषेश दुरुस्ती ची ३९.५८ कोटी ४.४४०८०४६ ग्रेड गोडाऊन ची १२ कोटी देयके विभागाला सादर केले आहेत. देयके रुपयांचे कामे झाली आहेत. मात्र शासनाकडुन फक्त ४५ कोटी निधी आला आहे. अपुऱ्या निधीच्या येण्यामुळे सर्व कामे संथ गतीने सुरू आहे. यामुळे स्थानिक लोक प्रतिनीधी व नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कामे पुर्ण होण्याची मागीण बांधकाम विभागाकडुन करण्यात येत आहे. ठेकेदारांना कुठल्याही प्रकारचे देयक मिळत नसल्यामुळे काम कसे करावे हेच कळत नाही.
नाशिक जिल्ह्याचे ५८६ कोटी इतके असले तरी शासनाकडून अगदी तुटपुंजी निधी देण्यात येत आहे. ज्याची टक्केवारी ७-१० टक्के इतकी आहे. जर असेच मार्च २०२३ पर्यन्त अल्पप्रमाणात निधी प्राप्त होत गेला तर पेंडिंग असलेल्या देयकाचे दायीत्व ७०० ते ८०० कोटी इतके होऊ शकते . अशीच परिस्थिती असली तर आमचे सर्व ठेकेदार बंधु हे दिवाळखोरीत जातील .
महाराष्ट्रातील बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया च्या सर्व सेंटर चेअरमन सोबत चर्चा केल्यानंतर असे निदर्शनास येते की महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील प्रलंबित देयकाची आकडेवारी जवळपास १००० ते १०००० कोटी इतके झालेले आहे व. आजमितीस म्हणजे ३१ मार्च २०२३ पर्यन्त २५००० ते ३०००० कोटीचे कार्यारंभ आदेश शासनाने दिलेले आहेत . या वर्षीच्या २०२३ च्या बजेट मध्ये जवळपास १२००० ते २५००० कोटीचे नवीन कामांना मजूरी दिलेली आहे . मंजूर झालेल्या कामाचे कार्यारंभ आदेश एप्रिल २०२३ मध्ये होतील व ते कामे देखील पुढील एका वर्षात पूर्ण होतील असे एकंदरीत ४०००० कोटीचे दायित्व मार्च २०२४ पर्यन्त होणार आहेत. जर असेच तटपुंजी निधी उपलब्ध होत राहिला . महाराष्ट्रातील सर्वच ठेकेदार कर्जबाजारी होतील . त्यामुळे अल्प प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या निधीत कामे कशी करावीत याबाबत आम्ही ठेकेदार विवंचनेत आहोत. तरी याबाबत आपण आपल्या स्थरावरून निधी उपलब्ध करण्यात यावा. बांधकाम विभागामार्फत करण्यात येणाऱ्या अंदाजपत्रकामध्ये खुप त्रुटी असून व साईटवर मटेरियल उपलब्ध नसताना देखील तेथे Quarry असतात असे दाखवून कमी Lead गृहीत धरून अंदाजपत्रके बनवली जातात व ठेकदारांना कामे करताना खुप अडचणी येतात त्यामुळे याबाबतीत आपण योग्य ते सहकार्य करावे.
यावेळी विजय घुगे, रमेश शिरसाठ, रवी आहेर, प्रशांत रौधळ, दिनकर कुमार पगारे, संदिप भुसे, अविनाश पाटील, अमर चौधरी, विजय बाविस्कर राजेद्र मुथा, रमेश शिरसाठ आदी सह ठेकेदार उपस्थित होते