नाशिक च्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना धरमपुरमध्ये अटक
धरमपुर : गुजरात
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सुरत येथे जात असताना सोमवारी (ता. ३) नाशिक शहर- जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांनी अटक केली . या सर्वांना दिवसभर धरमपुर (गुजरात) पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले.
राहुल गांधींना पाठिंबा दर्शवण्यासाठी विविध राज्यांतील काँग्रेसच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्ते सुरतच्या दिशेने रवाना झाले. मात्र, काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी रस्त्यातच अडवत अटक केली आहे. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले. यामध्ये नाशिकच्या समावेश होता. नाशिकच्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी रस्त्यात अडवले. त्यानंतर त्यांना अटक करत धरमपुर पोलीस ठाणे (वलसाड) येथे ठेवण्यात आले. यामध्ये पाटील यांच्यासह पूर्व विधानसभा अध्यक्ष जावेद पठाण मध्य विधानसभा अध्यक्ष जयेश सोनवणे, वकील सेल युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. कोनिक कोठारी, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय कोठूळे आदींचा समावेश होता
नाशिक च्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना धरमपुरमध्ये अटक
RELATED ARTICLES
Recent Comments
on Hello world!