HomeCrimeउपनगर परिसरात चार वाहनांची तोडफोड..

उपनगर परिसरात चार वाहनांची तोडफोड..

काल अंबड परिसरात दोन खून तर आज उपनगर परिसरात चार गाड्यांची तोडफोड नाशिक शांत होईना नाशिककर गुंडांच्या दहशतीखाली असल्याचे भासत आहे भालेराव मळ्यात जुन्या भांडणाचा राग मनात धरून शुक्रवारी रात्री जयभावानी रोड वरील भालेराव मळा, माणिक नगर मधील दोन चारचाकी सह दोन ऍक्टिव्हा मोटरसायकलची तोडफोड करण्यात आली. गुन्हा घडताच काही तासात उपनगर पोलिसांनी एका संशयीतास ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , उपनगर पोलीस ठाण्यात निलेश ज्ञानेश्वर भोई यांनी फिर्याद दिली की, शुक्रवारी रात्री संशयित हर्षद उर्फ बाळा गोविंद पवार (वय 20) राहणार माणिक नगर, जयभवानी रोड, भालेराव मळा, नाशिकरोड याने माझ्या चुलत्याच्या घरात घुसून हातात दगड घेऊन “माझ्या नादी लागू नका” असे बोलून घरातून निघून गेला व रात्रीच्या सुमारास कदम लॉन्स जवळील दुकानाच्या व आसपास बाहेर उभे असलेल्या चारचाकी टाटा एस गाडी,दोन एक्टिवा मोटरसायकल, व ऑटो रिक्षा यांचे दगड मारून काचा फोडून नुकसान केले.

घटनेची माहिती उपनगर पोलिसांना समजताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी,पोलीस हवालदार विनोद लखन, अनिल शिंदे, जयंत शिंदे, सुरज गवळी, पंकज कर्पे यांनी काही तासात संशयीतास ताब्यात घेतले. तसेच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

मागील पंधरवड्यात विहितगाव येथील एका सोसायटीमधील चार गाड्यांची जाळपोळ करून पंधरा गाड्याची तोडफोड दोन मद्यपी युवकांनी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आनंद नगर, धोंगडे मळ्यात पाच ते सहा चारचाकी गाड्यांचे नुकसान करून नऊ युवकांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र उपनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे या संशयित गुन्हेगारांना तात्काळ मोठ्या शिताफीणे ताब्यात घेतले होते.परिसरात खळबळ उडाल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी धोंगडे मळ्यात दहशत निर्माण करणाऱ्या 9 संशयित विरुद्ध मोक्काची कारवाई केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दादा भुसे यांनी घटनास्थळी भेट दिली होती. व सरकार आपल्या बाजूने असल्याचा दिलासा रहिवाशांना दिला होता.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!