Homeहेल्थदलित पॅंथरचा तारा निखळला.. मदन शिंदे

दलित पॅंथरचा तारा निखळला.. मदन शिंदे

 

दलित पॅंथरचा तारा निखळला
विद्यार्थी दशकापासूनच समाजकारणची ओढ असलेला, भारतीय दलित पॅंथर दलित पॅंथर मास मोमेंट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असा प्रवास करीत आज जगाचा निरोप घेतला. तो चळवळीतला कार्यकर्ता म्हणजे मदन शिंदे. 1976 पासून मदन शिंदे हे सामाजिक कार्यकर्ता म्हणून नाशिक राजवाड्यातून पुढे आले होते. महाराष्ट्रातील अतिशय आक्रमक चळवळ दलित पॅंथर च्या माध्यमातून मदन शिंदे यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली होती. नामदेव ढसाळ राजा ढाले रा.सू गवई अशा दिग्गज नेत्यांसोबत मदन शिंदे यांनी मागासवर्गीय चळवळीचा काम उभं केलं होतं. अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आलेला आलेला कार्यकर्ता म्हणून मदन शिंदे यांची ओळख होती नाशिकचा आक्रमक चेहरा म्हणून मदन शिंदे यांच्याकडे पाहिले जायचं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते म्हणून ते काम करीत होते. मदन शिंदे म्हणजे दलित पॅंथरचा वाघ म्हणून त्यांची नाशिकमध्ये पाहिलं जायचं. चळवळीतल्या अनेक केसेस मदन शिंदे यांनी आपल्या अंगावर घेतल्या होत्या आजही त्यांचे न्यायालयात घटले चालू होते त्यांना समंस येत होते. समाजासाठी रान पेटवून उठणारा बदल शिंदे आज आपल्यात नाहीत. 1972 ते 2023 पर्यंत गेले 51 वर्ष मदन शिंदे यांनी फक्त जनतेसाठी काम केले आहे. सध्याची मदन शिंदे यांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती हे आजाराने ग्रस्त होते गेल्या एक महिन्यापासून ते अंथरुणावरती पडून होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी महापौर अशोक दिवे शंकरराव काकळीच प्रकाश लोंढे प्रकाश पगारे बाळासाहेब शिंदे भिराज जाधव संजय साबळे अण्णासाहेब कटारे नानासाहेब भालेराव गणेश उनवणे शशीभाई उनवणे अविनाश आहेर लक्ष्मी ताठे अशी अनेक मागासवर्गीय चळवळीतील नाव आहेत की ज्यांच्यासोबत मदन शिंदे काम करीत होते. मदन शिंदे यांच्या निधनाने मागासवर्गीय समाजात न भरून निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मंथन शिंदे यांच्या जाण्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. दि हिंद न्यूज सतीश रूपवते नाशिक.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!