प्रमोद रहाणे l भगुर:- भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, एक संवेदनशील कवी, भारताचे माजी पंतप्रधान मा. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती भगुर मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त भगुर येथे लाडू वाटप करण्यात आले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन मधुकर कापसे, युनुस शेख यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वाजपेयी यांच्या स्मृतीना उजाळा देण्यात आला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष प्रसाद आडके, निलेश हासे, प्रताप गायकवाड, संदीप वालझाडे, विलास कुलकर्णी, सुनील जाधव, अनंता कापसे, मयूर शेटे, राजेंद्र ओहोळ, प्रमोद शेटे, दत्ता आहेर, शिवाजी आव्हाड तसेच भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.