HomeUncategorizedसंवाद हे आनंदाचे टॉनिक - बोरस्ते

संवाद हे आनंदाचे टॉनिक – बोरस्ते

 

प्रमोद राहणे देवळाली कॅम्प

संवादाने मन मोकळे होते. लोकांमध्ये मिसळणे गप्पा मारणे, हेच आनंदाचे टॉनिक आहे. निफाड तालुक्यातील साकोरे गावातील शाळा आणि शिक्षकांनी वाचण्याची लिहिण्याची प्रेरणा दिली. उपनगरच्या महाराष्ट्र हायस्कूल येथे चार वर्षे शिकवल्यावर, नाशिक महानगरपालिकेच्या बी.डी. भालेकर शाळेत रुजू झालो. शिक्षकांनी बहुमताने आमदार केले. सभागृहात वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्यामुळे काव्य प्रतिभा फुलली. विविध समस्यांवर कवितांमधून भाष्य केले. अर्थ संकल्पावर कोटी केल्यावर त्याची दखल घेतली गेली. दप्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी कविता केली तासेच शिक्षण व्यवस्थेवर भाष्यही केले, असे प्रतिपादन कवी तथा माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिकरोडच्या संवाद सृजनाशी मालिकेच्या दुसऱ्या पर्वातील सहावे पुष्प गुंफताना केले. अध्यक्ष दशरथ लोखंडे यांनी मायेची शाल, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथभेट देवून त्यांचे स्वागत केले.

‘इथे झाल्या परीक्षा थोर.. आंब्याच्या वनात नाचेना मोर’

व ‘सत्तासुंदरी चालत होती ‘ या कविता सादर केल्या. बोरस्ते पुढे म्हणाले की “साहित्याला समाजाभिमुख करण्याचे काम नाशिकरोडची महाराष्ट्र साहित्य परिषद करते. दुलाजीनाना पाटील, मालोजीकाका मोगल यांनी राजकारणात तर विनायकदादा पाटील यांनी साहित्याची प्रेरणा दिली. कवी विठ्ठल वाघ यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. सहकारक्षेत्रात काम केले. नाशिकच्या अग्रगण्य सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष, अध्यक्ष होता आले. तेथे अनेक लेखकांशी संपर्क आला. त्यातून व्यक्तिमत्त्व घडत गेले, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा पाटील यांनी केले. योगिता मिंदे यांनी स्वागत काव्य सादर केले. शिवाजी म्हस्के यांनी प्रास्ताविक केले, तर कांचन पवार यांनी अतिथिंचा परिचय करून दिला. डॉ. सुधीर ठोसर यांनी आभार मानले. योगिनी पैठणकर यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी प्राचार्य के.मा. मोरे, सुभाष टिळे, उत्तम तेजाळे, ई . के.कांगणे, प्रदीप डोंगरे, डी.एस. हरबा, चंद्रकांत शिंदे, राजेंद्र हिंगे, प्रिया बिचवे आदी उपस्थित होते. प्रमोद रहाणे दि हिंद न्यूज देवळाली कॅम्प

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!