Homeधार्मिकदेवळालीत ख्रिसमस, नाताळ सण उत्साहात साजरा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल.

देवळालीत ख्रिसमस, नाताळ सण उत्साहात साजरा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल.

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :- शहरात ख्रिस्ती बांधवांचा पवित्र ख्रिसमस अर्थात नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिश्चन बांधवांनी एकमेकांना सणाच्या आणि नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात.

देवळालीतील सेंट पॅट्रिक चर्चमध्ये आयोजित कार्यक्रमात ख्रिस्ती बांधवांच्या उपस्थितीत फादर पायस रॉड्रिक्स यांनी पवित्र मिसा अर्पण केली. तसेच येशूच्या जन्मानिमित्त संदेश दिला. प्रभू येशूच्या मूर्तीची गव्हाणीत स्थापना करण्यात आली. सकाळी फादर विन्सेंट परेरा यांच्या प्रमुख उपस्थितीत मिसा अर्पण करण्यात आली. कॉफी-केकचे वाटप करण्यात आले. दिवसभर प्रार्थना व देखावा पाहण्यासाठी ख्रिस्ती बांधवांची रिघ लागली होती. तत्पूर्वी चर्चच्या वतीने ख्रिसमस कॅरेल्स गीतांचे गायन व नाट्यभिनय सादर करण्यात आले. मध्यरात्रीनंतर लहान मुलांसह उपस्थित समाजबांधवांनी आपल्या नातेवाईकांसह विविध गीतांवर नृत्य सादर करुन आनंद व्यक्त केला. युवक मंडळाच्या माध्यमातून घरोघरी जात ख्रिसमस गीत गायन करण्यात आले. चर्च परिसराला नेत्रदिपक विद्युत रोषणाई, आकर्षक सजावट करण्यात आली होती. उत्सव साजरा करण्यासाठी सुन्नी पिल्ले, केना अँटोनी, पॅट्रिक स्वामी आदिंसह ख्रिस्ती बांधव प्रयत्नशील होते.

*****************************

देवळालीतील गवळीवाडा भागात असणाऱ्या खाईस्ट चर्च येथे प्रिस्ट बिटर इनचार्ज रेव्हरंड रुपेश निकाळजे यांनी उपस्थित समाजबांधवांना संदेश दिला. प्रभू येशूच्या जन्मानंतर खऱ्या अर्थाने मानव व देव यांच्यातील संबंध प्रस्थापित होण्यास मदत झाली असे मीडनाईट सर्व्हिस मध्ये त्यांनी सांगितले. ख्रिसमच्या दिवशी मुख्य उपासना व पवित्र सहभागिताच्यावेळी देखील प्रभू येशू यांचा जन्म लोककल्याणकरीता झाला असल्याचे निकाळजे यांनी सांगितले. यावेळी रेव्हरंड डिकन प्रशांत नाडे उपस्थित होते. दरम्यान तीन दिवस कॅरल राउंड घेण्यात आले. रविवार दि.२४ रोजी सकाळी १० वा. बाप्तिस्मा विधी, रात्री १० वा. मध्यरात्रीची उपासना व पवित्र सहभागिता झाली. त्यानंतर सोमवार दि.२५ रोजी सकाळी १० वा ख्रिस्त जन्मोत्सव व पवितास सहभागिता पार पडल्यानंतर सामूहिक भोजन झाले. याप्रसंगी चर्चचे सचिव राजेश गोर्डे, राहुल मकासरे, शोभा जाधव, बाळासाहेब हगांरगे, राजिंदरसिंह ठाकूर, रंजना साठे, निखिल शिरसाठ, रविना साठे, पीटर वर्रा, याकोब उकरंडे आदींसह महिला, तरुण,शाब्बाथ शाळा भजनी मंडळासह ख्राईस्ट चर्चचे सर्व सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!