HomeCrimeनायलॉन मांजा विक्री प्रकरणी भगुरच्या एकावर देवळाली कॅम्प मध्ये कारवाई.

नायलॉन मांजा विक्री प्रकरणी भगुरच्या एकावर देवळाली कॅम्प मध्ये कारवाई.

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प:- गुरुवार दिनांक ४ जानेवारी रोजी देवळाली कॅम्प शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या भगुरच्या एका जनावर कारवाई करण्यात आली. नासिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस हवालदार गुलाब सोनार यांना नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या बाबत गोपनिय बातमी मिळाली होती. त्यानुसार त्यांनी देवळाली कॅम्पच्या लेव्हीट मार्केट समोर सापळा रचला होता. त्यावेळी तिथे प्रितेश गणेश सोनवणे, वय १९ वर्ष, रा. सुभाषरोड, कुंभारवाडा, भगुर हा नायलॉन मांजा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेला आढळून आला. त्यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे नायलॉन मांजाचे १० गट्टू आढळून आले. त्यामुळे त्याला सुमारे २ लाखांची पल्सर दुचाकी, तसेच ८ हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे गट्टू या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. आणि त्याच्यावर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची सापळा कारवाई नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोउपनि संदेश पाडवी, सपोउपनि. बाळु शेळके, पोहवा. गुलाब सोनार, पोहवा. शंकर काळे, पोहवा. प्रशांत वालझाडे यांच्या पथकाने केली. प्रितेश सोनवणे यांच्याकडून बंदी असलेला नॉयलान मांजा व पल्सर मो.सा असा एकुण २,०८,०००/- रू किचा मुददेमाल जप्त करन्यात आला. त्यास जप्त मुददेमालासह पुढील कार्यवाहीसाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!