HomeCrimeबंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणा-या इसमावर धडक कारवाई.गुन्हे शाखा युनिट-१ ची...

बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणा-या इसमावर धडक कारवाई.गुन्हे शाखा युनिट-१ ची कामगिरी

प्रमोद रहाणे l नाशिक नाशिकचे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, गुन्हे व विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांनी बेकायदेशीररित्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिला होता.

त्या अनुषंगाने गुन्हे शाखा, यूनिट क्रमांक १ नाशिक शहरचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली होती की, स्वामी विवेकानंद नगर मखमलाबाद, नाशिक येथे दोन इसम बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार आहेत. सदरची बातमी वपोनि. विजय ढमाळ यांना कळवन्यात आली. त्यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि. चेतन श्रीवंत, पोलीस अंमलदार मिलींदसिंग परदेशी, राजेश राठोड, राहुल पालखेड़े, मुक्तार शेख, अमोल कोष्टी अशांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन सापळा रचला. त्याठिकाणी नायलॉन मांजा विक्रीसाठी आणणारे विकास शिवसिंग देवरे, वय-२७वर्षे, रा-मखमलाबाद, नाशिक, तसेच अभिषेक सोपान भंडागे, वय-२१ वर्षे, रा. मखमलाबाद नाशिक यांना ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्यांचे कब्जात मिळून आलेल्या दोन प्लॅस्टीकच्या गोण्यांमध्ये असलेले ४३ नग बंदी असलेला मोनोकाईट कंपनीचे नायलॉन मांजाचे गट्‌टू किंमत ३३,६०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्या विरुध्द म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पतंग उडविण्यासाठी बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!