Homeताज्या बातम्यापंतप्रधान मोदी गोदावरी आरतीसह करणार काळारामाचे दर्शन!

पंतप्रधान मोदी गोदावरी आरतीसह करणार काळारामाचे दर्शन!

नाशिक :

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत्या शुक्रवार, दि. १२ जानेवारी रोजी राष्ट ्रीय युवा महोत्सवासाठी आल्यानंतर दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीची पूजा, महाआरती आणि श्री काळाराम मंदिरात दर्शन आणि पूजा करून महाआरती करणार आहेत. मोदींच्या अशा अचानक लांबलेल्या दौर्‍यामुळे प्रशासनाची मात्र एकच धावपळ उडाली आहे.

यासाठी पोलिसांचा बंदोबस्तदेखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. तसेच, गोदाघाटासह परिसर सुंदर दिसावा या हेतूने अतिक्रमण काढून परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी भित्तीचित्रे काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत आहेत. निलगिरी बाग ते तपोवनापयरत रोडशो होणार आहे.

त्यानंतर ते थेट रामकुंड येथे येणार असून रामकुंड येथे गोदावरी नदीची पूजा करून गोदावरीची महाआरती करणार आहेत. तसेच, यानंतर प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेऊन पूजा करून आरती करणार आहेत. अशाप्रकारे मोदींच्या पूर्व नियोजित कार्यक्रमात अचानक वाढीव बदल झाल्यामुळे जिल्हा प्रशासन डोळ्यात तेल घालून कामाला लागलेले दिसून येत आहे.

याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुे संदीप कर्णिक यांनी बुधवार दि. १० जानेवारी रोजी सकाळी पंचवटी पोलीस ठाण्यात येऊन उपायुे किरणकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, राजू पाचोरकर, विजय ढमाळ, रणजित नलवडे यांच्यासह सर्व युनिटचे अधिकारी, स्कॉडचे अधिकारी यांच्यासह पोलीस अधिकार्‍यांसह बैठक घेत सुरक्षा आणि बंदोबस्ताचा आढावा घेतला. चोख बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली असल्याने बाहेर गावावरून आलेल्या पोलीस कर्मचार्‍यांची राहण्याची व्यवस्था मंगल कार्यालय, मनपाचे हॉल याठिकाणी करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोदावरी आरती, पूजेसाठी १० मिनिटे आणि श्री काळाराम मंदिरात पूजा आणि महाआरतीसाठी २५ मिनिटे थांबणार आहेत. यासाठी एसपीजी स्कॉडने संपूर्ण परिसराची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी काळाराम मंदिरात येणार असल्याने मंदिराच्या बाहेर असलेल्या इमारती, वाडे यांच्या भिंतींवर चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींकडून रामायणातील आणि प्रभू रामचंद्रांची चित्रे काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

परिणामी, परिसरातील पडक्या वाड्यांच्या आणि मोकळ्या असलेल्या भिंती व संपूर्ण परिसर नाविन्यपूर्ण दिसायला लागला आहे. संपूर्ण पंचवटी परिसराची अवस्था अत्यंत बिकट झालेली असून त्यात अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने ती काढण्यासाठी मनपा अतिक्रमण विभागाची धावपळ उडाली आहे. तर संपूर्ण गोदाघाट परिसरात झालेले अतिक्रमण काढणेदेखील डोकेदुखी ठरणार आहे. त्यात ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने अनेक अडचणी निर्माण झालेल्या दिसत आहे.

मनपा अधिकारीवर्गाकडून बारकाईने काम…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लांबलेल्या दौर्‍यामुळे संपूर्ण गोदाघाट परिसरासह पंचवटी परिसरात ठिकठिकाणी महापालिकेचे अधिकारी पाहणी करत सूचना देताना दिसत आहेत. गोदाघाट परिसरात अनेक धोकादायक पडके वाडे असल्याने त्यांची पाहणी करून योग्य ती काळजी घेतली जात आहे. तसेच अजून कुठे काही कमतरता राहू नये, यासाठीदेखील अधिकारीवर्ग बारकाईने काम करत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!