Homeताज्या बातम्या२७व्या राष्ट्रीय युवा महोत्सव! केंद्रीय राज्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी केली कार्यक्रम...

२७व्या राष्ट्रीय युवा महोत्सव! केंद्रीय राज्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी केली कार्यक्रम स्थळाची पाहणी

नाशिक :

नाशिक येथील तपोवन मैदानावर होणाऱ्या २७व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. १२ जानेवारी रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने आज संध्याकाळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्य कार्यक्रम स्थळाची पाहणी करून अंतिम टप्प्यात सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला.

या महोत्सवासाठी परराज्यातून येणाऱ्या युवकांची निवास व भोजन व्यवस्थेत कोणतीही उणीव राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच या कार्यक्रमस्थळी येतांना वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी नियोजन करावे. कार्यक्रमस्थळी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यांची व्यवस्था करण्यात यावी.

राष्ट्रीय युवा महोत्सवाचा उद्घाटन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे, अशा सूचना ही यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या आहेत. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!