Homeताज्या बातम्याशिंदे गट हीच खरी शिवसेना! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा महत्वपूर्ण निकाल

शिंदे गट हीच खरी शिवसेना! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा महत्वपूर्ण निकाल

मुंबई |

महाराष्ट्रच नव्हे, तर अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मूळ शिवसेना पक्ष म्हणून एकनाथ शिंदे गटाला मान्यता देत असल्याचं सांगतउद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. (MLAs Disqualification Verdict Shinde group is the real Shiv Sena President Narvekars verdict)

त्याचप्रमाणे शिंदे समर्थक १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिकाही फेटाळली. एकनाथ शिंदे यांच्याकडे ३७ आमदार होते, भरत गोगावले हे अधिकृत प्रतोद आहेत, असं राहुल नार्वेकरांनी सांगितलं. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे एकटे गटनेत्याला पदावरुन काढू शकत नाहीत.

शिवसेनेच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीला अंतिम निर्णयाचे अधिकार आहेत. पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची केलेली हकालपट्टी अमान्य आहे, असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!