Homeताज्या बातम्या१० हजार कामगारांनी काळ्या फिती लाऊन केला पंतप्रधान मोदींचा निषेध

१० हजार कामगारांनी काळ्या फिती लाऊन केला पंतप्रधान मोदींचा निषेध

नाशिक । कामगारांना आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी पंतप्रधानांनी वेळ न दिल्याने कामगारांनी काळ्या फिती लावून निषेध केला. आज दि. १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. त्यांना भेटण्यासाठी कष्टकरी वर्ग यांनी वेळ मागितला होता परंतु पंतप्रधानांनी त्यांना ५ मिनिटांचा देखील वेळ दिला नाही त्यामुळे हजारो मागणी कर्त्यांचा अपमान केला आहे, यामुळे कामगारांच्या मध्ये संतापाची लाट ह्या निषेध आंदोलनातून दिसून आली.

शंभर वर्षाच्या कामगार चळवळीच्या संघर्षातून मिळालेले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत नमूद केलेले २९ कामगार कायदे मोदी सरकारने 2020 मध्ये रद्द करून कार्पोरेट धार्जिने व कामगार विरोधी ४ श्रम संहिता मंजूर करून घेतल्या. यामुळे कामगारांना गुलामीचे जीवन जगावे लागणार आहे, कंत्राटीकरण बेसुमार वाढले आहे.

कारखाने बंद पडत असून बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, छोटे व मध्यम उद्योग अडचणीत आले आहेत. शिकाऊ कामगारांच्या नावाखाली तरुण कामगारांचे शोषण सुरू आहे .म्हणून हे कार्पोरेट धार्जिने व कामगार विरोधी ४ श्रमसंहिता रद्द कराव्यात या मागणीसाठी अल्फ इंजिनिअरिंग, आर्ट रबर, कॅपिटल फ्रुट, नाशिक ऑटोटेक, रिलायबल ऑटोटेक, सि.जी.लुसी, सुदाल, TDK, आनंद आय पावर, सोमेश फोर्जिंग, शिप्रा, सिंग इंजिनिअरिंग, गोल्डी, तसेच जिल्ह्यातील सर्व सिटु सभासदांनी काळ्याफिती लावून काम केले व गेटवर निदर्शने केले.

कामगार वर्गाचा असंतोष पंतप्रधान मोदी यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली. हे आंदोलन माकपाचे नेते व सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी. एल. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व सिटूचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड सिताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे, कल्पनाताई शिंदे, संतोष काकडे, तुकाराम सोनजे, सतीश खैरनार, आत्माराम डावरे, अरविंद शहापुरे, राहुल गायकवाड, मोहन जाधव, निवृत्ती केदार, संजय पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!