Homeताज्या बातम्याअभिनव बाल विकास मंदिर शाळेत राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती साजरी

अभिनव बाल विकास मंदिर शाळेत राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती साजरी

प्रमोद रहाणे l भगुर :

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित अभिनव बाल विकास मंदिर, भगूर या शाळेत स्वराज्यजननी, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त प्रतिमापूजन शालेय समिती सदस्य दादासाहेब देशमुख तसेच शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे यांनी केले.

माई खैरनार यांनी राजमाता जिजाऊ व श्रीमती कल्पना भोर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती दिली. तनुजा तुपे, वैष्णवी जाधव, प्रिया जाधव, शुभांगी तुपे, सिद्धी वीर, शिवराज पाटोळे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या कार्याची ओळख करून दिली. अनेक विद्यार्थिनी राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत शाळेत उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे गुण आत्मसात करण्याचे आवाहन मुलांना केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!