नवी दिल्ली :
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इंडिया आघाडीच्या व्हर्चुअल बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर एकमत झाले. अशा स्थितीत आता इंडिया आघाडीचं नेतृत्व खरगे यांच्याकडे राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.
विरोधी पक्षांच्या बैठकीत जागावाटपापूर्वी अध्यक्षंच्या नावावर एकमत झाले आहे. यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना समन्वयक बनवण्याची चर्चा होती. मात्र, नितीशकुमार यांनी समन्वयकपद स्वीकारण्यास नकार दिला. मला कोणत्याही पदाची इच्छा नाही असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केलं आहे.
बरीच चर्चा झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षांची इंडिया आघाडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीत २०२४ च्या लोकसभा निवडणूकीसाठीच्या जागावाटपाचा फॉर्मुला अद्याप निश्चीत झालेला नाहीये. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे या पदासाठी उमेदवार होते. मात्र बैठकीत खुद्द नितीश कुमार यांनी मात्र काँग्रेसच्या नेत्याने हे पद सांभाळले पाहिजे असे सांगितले.