प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :- भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या तीन शाळांना १३५ ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. त्यामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना ऐन थंडीत मायेची ऊब मिळणार आहे.
एक सामाजिक बांधिलकी म्हणून भगूर परिसर जेष्ठ नागरिक संघ विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतो. त्यानुसार मंगळवारी इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मायदरा येथील प्राथमिक शाळेत १६ विद्यार्थ्याना ब्लँकेट वितरण जि. प. सदस्य हरिदास लोहोकरे, सरपंच बहिरू केवारे, पोलीस पाटील किशोर केवारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष त्रंबक केवारे, मुख्याध्यापक उमेश गरुड तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिरेवाडी शाळेत 33 विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिता भांगे, मुख्याध्यापक शिवाजी भगत, शिक्षक विनायक पानसरे, ग्रामस्थ तसेच पालक यांच्या उपस्थितीत ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. राहुल नगर येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत ८२ विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष लक्ष्मण मल्ले, बाळू मल्ले, ग्रामपंचायत सदस्य पोपट मल्ले, मुख्याध्यापक नामदेव बोराडे, शिक्षक मारुती मोहरे, रवींद्र जोगदंड, आदीं उपस्थित होते. ब्लॅंकेट वाटप कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख, पदाधिकारी काशिनाथ उबाळे, खंडेराव गायकवाड, सदाशिव सांबरे, कचेश्वर मोरे, किरण बेदरकर, देवराम मुठाल, रमापती चव्हाण, मारुती कोरडे, चंद्रकांत काळे, नरेंद्र जोशी, अंबादास पाटील, त्रंबक करंजकर, रावसाहेब गाडे, सुभाष गायकवाड आदी प्रयत्नशील होते.