Homeनाशिक लोकलमहावितरणच्या लोडशेडिंग मुळे लोहशिंगवे, लहवीत,वंजारवाडीकर त्रस्त.

महावितरणच्या लोडशेडिंग मुळे लोहशिंगवे, लहवीत,वंजारवाडीकर त्रस्त.

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :-
लोहशिंगवे, लहवीत, वंजारवाडी या गावांना महावितरण कडून लोडशेडींग राबविण्यात येत आहे. खंडित वीजपुरवठा मुळे गावकरी त्रस्त झालेले आहेत. या संदर्भात महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता तपासे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
लोहशिंगवे, लहवीत, वंजारवाडी या गावांना भगूर सब स्टेशन वरून धामणगाव फिडरद्वारे विद्युत पुरवठा करण्यात येतो. जानेवारी महिन्यापासून दिवसा आठ तास असलेला थ्री फेज विद्युत पुरवठा दोन तासही चालत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी भरत नाही. तसेच रब्बी हंगामातील कांदा, गहू व भाजीपाला पिके यांना वेळेवर पाणी देता येत नाही. त्यामूळे ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक २९ रोजी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता तपासे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
लोहशिंगवे गावात ८ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान धर्मनाथ बीजचा उत्सव साजरा होणार आहे. गोरक्षनाथ मंदिर परिसरात विद्युत वाहिनीच्या तारा लोंबलेल्या अवस्थेत आहेत. मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये. कुठल्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये. यासाठी उपाययोजना करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. कार्यकारी अभियंता तपासे यांनी निवेदनाची दखल घेऊन महावितरण च्या देवळाली कॅम्प विभागाचे शाखा अभियंता संदिप चव्हाण यांना विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा या बाबत सूचना केली. तसेच धर्मनाथ बीजच्या आत गोरक्षनाथ मंदिराजवळील विद्युत तारांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन अभियंता तपासे यांनी ग्रामस्थांना दिले. याप्रसंगी युवराज जुन्द्रे, शंकर चौधरी, विश्राम पाटोळे, संदीप पराड, रंगनाथ पाटोळे, शांताराम जुन्द्रे, जगदीश रकीबे, अनिल पाटोळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!