नाशिक l प्रतिनिधी :- नासिक येथील वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी किरण कारभारी आहेर, राहणार हनुमान चौक, नवीन सिडको, नाशिक. यांच्यावर कुबेर लॉन्स, बडदे नगर, सिडको, नाशिक येथे वृत्त संकलन करण्यास केले असता दोघा गुंडांनी अचानक हल्ला केला. तसेच किरण आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. अश्लील भाषेत शिवीगाळ केली. लाथा बुक्क्याने मारहाण करून सदरचे गुंड तेथून निघून गेले. याबाबत किरण आहेर यांनी अंबड पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद नोंदवली आहे. परंतु अद्यापही या प्रकरणातील मुख्य गुन्हेगार व त्यांचे साथीदार यांना पोलिसांनी अटक केलेली नाही. त्याचप्रमाणे संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या घटनेचा महाराष्ट्र प्रसार माध्यम पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथा स्तंभावर झालेला हल्ला आहे. त्यातून पत्रकारांच्या मुस्कटदाबीचा प्रयत्न केला जात आहे. गुंड, मवाली, टवाळखोर यांच्यात पोलीस, नियम, कायद्याचा धाक, दरारा, शिल्लक राहिलेला नसल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे संबंधितांवर मोक्का तसेच पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा. पत्रकार किरण आहेर यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस सुरक्षा पुरविण्यात यावी. अशी मागणी महाराष्ट्र प्रसार माध्यम पत्रकार संघातर्फे सतीश रूपवते, अविनाश आहेर, गुलाब मणियार, संजय परमार, मोसिन पठाण, अमर सोळंके, हेमंत काळमेघ, कमलाकर तिवडे, अजिज सय्यद, बंटी आढाव, सचिन गायकवाड, राजू शिलावट यांच्यासह अन्य पत्रकारांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन मा. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना देण्यात आले आहे.
दरम्यान पत्रकार किरण आहेर यांच्यावर झालेल्या हल्याबाबत तसेच हल्लेखोरांवर कारवाईबाबत पत्रकार संघाच्या वतीने अविनाश आहेर, सतीश रूपवते, गुलाब मणियार यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा.
Recent Comments
on Hello world!