HomeCrimeनासिक बार असोसिएशन तर्फे वकिलांच्या हत्येच्या निषेधार्थ धरणे आंदोलन.

नासिक बार असोसिएशन तर्फे वकिलांच्या हत्येच्या निषेधार्थ धरणे आंदोलन.

नाशिक l प्रतिनिधी:- अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील न्यायालयात वकिली करणारे एडवोकेट राजाराम जयवंत आढाव व त्यांच्या पत्नी एडवोकेट मनीषा राजाराम आढाव यांची त्यांच्या पक्षकारांनी निर्घृण हत्या केली. या घटनेचा नाशिक बार असोसिएशनने निषेध केला. नाशिक जिल्हा न्यायालयासमोर मंगळवारी सकाळी १२ ते दुपारी २ वाजेपर्यंत काम बंद आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या एडवोकेट प्रोटेक्शन आणि एडवोकेट वेल्फेअर ॲक्ट त्वरित लागू करण्यात यावा. यासाठी जिल्हाधिकारी नाशिक यांना नाशिक बार असोसिएशन तर्फे निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राहुरी जिल्हा अहमदनगर न्यायालयात वकिली करणाऱ्या एडवोकेट आढाव पती-पत्नी यांची गुन्हेगारांनी निर्घृण हत्या केलेली आहे. सदरची घटना ही अमानुष आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. वकिलांवर प्राणघातक हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अशा हल्लेखोर आरोपींना जास्तीत जास्त कडक शासन करण्यात यावे. सदर गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने व निष्पक्षपातीपणे होऊन सदरचा खटला जलदगतीने चालवण्यात यावा. वकील हा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झगडत असताना त्याच्यावर मात्र महाराष्ट्र सरकार एडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर न करून अन्याय करत आहे. सदर कायदा लवकरात लवकर मंजूर न झाल्यास महाराष्ट्रातील तमाम वकील वर्गास आंदोलन, उपोषण व मोर्चे या मार्गांचा अवलंब नाइलाजाने करावा लागेल. असेही निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. निवेदनावर नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट नितीन ठाकरे यांची स्वाक्षरी आहे. सदरचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान या आंदोलनाबाबत एडवोकेट सुरेश आव्हाड यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
बाईट्स एडवोकेट सुरेश आव्हाड.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!