HomeCrimeदेवळाली कॅम्प पोलिसांची पायी गस्त .

देवळाली कॅम्प पोलिसांची पायी गस्त .

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :- नागरिकांशी थेट संपर्क वाढावा. नागरिक पोलीस यांच्यात सुसंवाद व्हावा. गुन्हेगारीला आळा बसावा. यासाठी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालय हद्दीतील पोलिस ठाण्याच्या प्रमुखांना पायी गस्त सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत गेल्या चार पाच दिवसापासून पायी गस्त सुरू केली आहे. या दरम्यान १७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयाची सूत्रे हाती घेतल्यापासून सातत्याने नवनवीन संकल्पना अंमलात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्या अंतर्गत नागरिकांशी थेट संवाद साधला जावा. रस्त्यावरच्या गुन्हेगारीला आळा बसावा. गुन्हेगारांवर जरब, धाक, दरारा निर्माण व्हावा. नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास आणि सुरक्षिततेची भावना वाढावी. या हेतूने नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पायी गस्त हा उपक्रम सुरू केला आहे. त्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
हा उपक्रम देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी लेव्हिट मार्केट, झेंडा चौक, ऑप्शन रोड सिलेक्शन कॉर्नर, जुने बस स्थानक, वडनेर रोड, संडे मार्केट, जामा मस्जिद, संसरी नाका, लाम रोड, तसेच भगुर बस स्थानक, गायकवाड गल्ली, छ. शिवाजी चौक, तेली गल्ली, मोठा गणपती, बलकवडे व्यायाम शाळा, मीनारा मस्जिद, करंजकर गल्ली, समतावाडी, भगूर नाका नंबर २ या परिसरात पायी गस्त राबवली. ही गस्त घातली जात असताना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ११२/११७ अन्वये सार्वजनिक शांततेचा भंग करणारे, गैरवर्तन करणारे, समूहाव्दारे चिथावणी देनारे तसेच गैरकृत्य करणारे टवाळखोर, गुंड, मवाली अशा १७ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. पायी गस्त उपक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे, पोलिस हवालदार अनिल पवार, गीते, नागरे, बिडगर, महिला पोलिस शिपाई रोहिणी खकाळे, शितल जोंधळे, सुनयना कांडेकर आदिंसह पोलिस हवालदार शाम कोटमे, बागुल, पवार, पोलीस शिपाई सरकटे, जाधव आणि गुन्हे शोध पथक सहभागी झाले होते. पायी गस्त सुरूच रहाणार आहे. ह्या उपक्रमाबाबत जनतेने समाधान व्यक्त करुन स्वागत केले आहे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!