Homeताज्या बातम्याकार-बाईक रॅलीने वेधले शहरवासियाचे लक्ष

कार-बाईक रॅलीने वेधले शहरवासियाचे लक्ष

नाशिक: स्वीप उपक्रमांतर्गत मनपाच्या वतीने चांगले कार्यक्रम राबविले जात आहेत. सर्वांनी मतदान करून मतदानाची टक्केवारी शंभर टक्के मतदान पर्यंत न्यावी असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले.

महानगरपालिका, जिल्हाधिकारी निवडणूक कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय आणि किंग्स ऑफ रोडस व सुपर बाईकर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती व सहभाग बाईक व कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने बाईक व कार रॅलीचे आयोजन हे उल्लेखनीय बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील प्रवेशद्वारापासून बाईक व कार रॅलीचे रॅलीचा शुभारंभ झाला. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जतिन रहेमान, पोलीस उपायुक्त बच्छाव, किरण चव्हाण, खांडवी ,मोनिका राऊत, जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी परदेशी, दीपक बिल्डर्सचे दीपक चंदे आदींसह सर्व विभागांचे विभाग प्रमुख व खाते प्रमुख मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
रॅली यशस्वीतेसाठी विभागीय अधिकारी राजाराम जाधव,योगेश रकटे, मदन हरिश्चंद्र,सुनिता कुमावत आदींनी परिश्रम घेतले.

 

नाशिक मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथून निघालेल्या बाईक व कार रॅलीच्या अग्रभागी जनजागृती करणारे ओपन जिप्सी वाहनास फुग्यांनी सजविण्यात येऊन त्यामध्ये कार्यक्रमास उपस्थित मान्यवर विराजमान झालेले होते. त्यांच्या माध्यमातून या वाहनातून मतदान जनजागृती करण्यात येत होती. त्या पाठोपाठ बाईकवर पोलिसांचे दामिनी मार्शल पथक सहभागी झाले होते. किंग्स ऑफ रोडस व सुपर बाईकर्स ग्रुप सदस्य बाईकवर सहभागी झाले होते.त्यांच्या पाठीमागे बसणाऱ्यांकडे असणारे जनजागृती फलक सर्वांना दर्शविले जात होते त्यातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले जात होते. त्यामध्ये विविध जनजागृती पर स्लोगन होते त्यात मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा, उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले जात होते.

रॅलीचा मार्ग
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथून कॅनडा कॉर्नर, कॉलेजरोड,भोसला कॉलेज मार्गे,जेहान सर्कल,डोंगरे वस्तीगृहा समोरून अशोकस्तंभ, घारपुरे घाट मार्गे मालेगांव स्टँड दिंडोरी नाका,पंचवटी कारंजा मार्गे रविवार कारंजा,रेडक्रॉस सिग्नल शालीमार येथून गडकरी चौक, एलआयसी सिग्नल, एबीबी सर्कल मार्गे गंगापूर गांवा गुप्ता उद्यान येथे समारोप झाला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!