Homeताज्या बातम्याशिक्षक मतदारसंघ निवडणूक पुढे ढकलली

शिक्षक मतदारसंघ निवडणूक पुढे ढकलली

नाशिक लोकल वृत्तसेवा
नाशिक : नाशिक
महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण व मुंबई विभाग पदवीधर मतदारसंघ तसेच मुंबई व नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील रिक्त झालेल्या जागांसाठी घेण्यात येणार्‍या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय भारतीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
8 मे रोजी द्विवार्षिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार निवडणुकीच्या रिंगणात उतरू इच्छिणार्‍यांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती.
निवडणुकीची अधिसूचना 15 मे रोजी प्रसिध्द केली होती. अर्ज भरण्याची प्रक्रियाही तेव्हापासूनच सुरू होणार होती. 22 मेपर्यंत अर्ज भरता येणार होते. 24 मे रोजी छाननी होणार असून 27 मेपर्यंत अर्ज माघारी घेता येणार होते. 10 जूनला मतदान होऊन 13 जूनला मतमोजणीअंती निकाल घोषित होणार होता.
परंतु उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता शाळांच्या सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली होती. या मागण्यांचा विचार करून, महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इच्छुकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
विधानपरिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे उद्धवसेनेचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील व नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत 7 जुलै 2024 रोजी संपत आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

गुंतागुंत वाढली
सध्या लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुुरू असून महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मेरोजी होणार आहे. 4 जून ला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. अशा परिस्थितीत शिक्षक मतदारसंघाच्याही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दोन्ही निवडणुकांमुळे गुंतागुतच वाढली होती.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!