वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाप्रमुख पवन पवार हे आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वाटेवर असून त्यांनी नुकतीच संजय राऊत यांची भेट घेतली. पवन पवार शिवसेना उद्धव ठाकरे गटात गेल्यामुळे वंचित बहुजन आघाडीला तोटा सोसावा लागणार आहे. पवन पवार म्हणतात मी बाळासाहेब आंबेडकरांवर नाराज नाही मग नेमकं नाशिक मध्ये पवन पवार कोणावरती नाराज आहे या चर्चेला उधाण आले आहे. तर भाजपचे विक्रम नागरे देखील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत ते सीमा हिरे यांच्यावर नाराज होते म्हणून त्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे यामुळे भाजपला मोठा फटका बसला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ फडफोडीचा राजकारण नाशकात चालू आहे. सीमा हिरे यांच्यावर नाराजी असल्याने विक्रम नागरेचा ठाकरे गटात प्रवेश येत्या पंधरा तारखेला पवन पवार व विक्रम नागरे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश घेणार आहेत. आज त्यांनी नाशिक मध्ये संजय राऊत यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार आहोत असे शिकवतो केले. मात्र काय खरे आणि काय खोटे हे 15 तारखेलाच कळेल.
नाशिक मध्ये भाजप आणि वंचित बहुजन आघाडीला धक्का
RELATED ARTICLES
Recent Comments
on Hello world!