कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे एचएएलसाठी असलेले योगदान पाहता ओझर येथील विमानतळास रिपब्लिकन सेनानी कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांचे नाव दिलेच गेले पाहिजे. नामकरणाबाबत राज्य व केंद्र शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित असून तो लवकरात लवकर मार्गी लावा, अशी मागणी आज युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे नेते तानसेन नन्नावरे यांनी केली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन विमानतळांचे नामकरण करतांना ओझर विमानतळाच्या नामकरणाला जाणीवपूर्वक बगल दिल्याचा आरोप करुन त्यांनी त्यांचा निषेधही केला. आज दादासाहेब गायकवाड यांची जयंती साजरी होत असतांना नन्नावरे यांनी पत्रकार परिषद घेऊन वरील मागणी केली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी संविधानाबाबत इंडिया आघाडीने केलेल्या प्रचाराचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, संविधान बदलणे शक्य नही. मात्र
इंडिया आघाडीने जाणीवपूर्वक मागासवर्गीय व मुस्लीम बांधवांची दिशाभूल करुन मते पदरात पाडून घेतली. त्यांचा फटका भाजपला बसला. मात्र, विधानसभा निवडणुकीत असे फेक नरेंटीव्ह चालणार नाही. त्याचा पर्दाफास आम्ही करणार आहोत. जनतेत जाऊन खरी वस्तुस्थिती समजून सांगणार आहेत. जे घडलेच नाही. घडणे शक्य नाही, अशा गोष्टी सांगून स्वतःच्या झोळीत मते पाडून घेण्याला आमचा विरोध आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. असे ते म्हणाले