कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव ओझर विमानतळाला मिळावे म्हणून तानसेन भाई नन्नावरे आक्रमक झाले असून येत्या विधानसभेत जर ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव दिले नाही तर सरकारला धडा शिकवणार असं वक्तव्य तानसेन भाई नन्नवरे यांनी केला आहे. यासंदर्भात येत्या 15 ऑक्टोबरला तानसेन भाई ननावरे गोल क्लब शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलणार आहेत. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं योगदान पाहता ओझर येथील निक विमान कारखान्याला दादासाहेब गायकवाड यांच्या प्रयत्नातून जागा उपलब्ध करून दिले आहे सदरील जागा ही सर्वसामान्य मागासवर्गीय जनतेचे असून या जागेवर ओझर विमान कारखाना प्रस्थापित करण्यात आला आहे. मागासवर्गीयांच्या या जागेचा मोबदला मागासवर्गीयांना दिला नाही. तत्कालीन सरकारने मागासवर्गीय समाजाच्या लोकांना आम्ही तुम्हाला ओझर मिग विमान कारखान्यात कामाला घेऊ किंवा आपला नातेवाईक उपेक्षित राहणार नाही म्हणून त्याला कामावर ठेवण्याचे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात तसेच झाले नाही. ओझर विमान कारखान्याला कर्मवीर दादासाहेब यांच्या प्रयत्नातून जागा मिळाली असून सदर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव मिळावे म्हणून मागासवर्गीय आंबेडकरी सर्व गटांनी मिळून अनेकदा खासदार आमदार मंत्री मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहेत मात्र या निवेदनाची दखल अद्यापही शिंदे फडणवीस सरकारने घेतलेली नाही म्हणून तानसेन भाई ननावरे आक्रमक झाले आहेत. पुढील काळात जर ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव मिळाले नाही तर मागासवर्गीय जनता व आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा तानसेन भाई नन्नवरे यांनी दिला आहे.
Recent Comments
on Hello world!