- दिना
बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि आमदारांचा राजीनामा द्यावा – चंदन पवार
राहुल गांधींना पत्र लिहिताना पवार यांनी म्हटले आहे की, देशात आत्ताच महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका झाल्या आहेत, त्यात महायुतीला यश मिळाले असून महाविकास आघाडीला सपशेल अपयश आले आहे, त्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेस पक्षाला 20 चा आकडाही ओलांडता आलेला नाही, परंतु लोकशाहीत काही पक्ष हारतात तर काही जिंकतात, यासाठी सर्वांनी जनतेच्या भावनांचा आदर केला पाहिजे. परंतु काँग्रेस पक्षातील महाराष्ट्रातील विजयी आणि पराभूत लोकप्रतिनिधी ईव्हीएम मशीनवर गदारोळ माजवत आहेत, सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम हॅक कसे होते? हे करून दाखवा असे आवाहन केले होते आणि कोर्टाने त्याचे प्रात्यक्षित दाखविण्यासाठी सर्व पक्षांना निमंत्रितही केले होते, परंतु कोणीही सर्वोच्च न्यायालयात गेले नाही, कारण राहुल गांधींसह सर्वांनाच माहीत आहे की ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही.
काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील नेते अजूनही ही गोष्ट मानायला तयार नाहीत, त्यामुळेच पवार यांनी राहुल गांधींना पत्र लिहून खुले आवाहन केले आहे की, भारतातील काँग्रेस पक्षाच्या सर्व खासदार व आमदारांना बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या असतील तर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या 101 खासदारांना एकत्रितपणे राजीनामे देण्यास सांगावे, त्यानंतर बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी जो खर्च येतो तो काँग्रेस पक्ष करेल असे जाहीर करावे, जेणेकरून देशातील जनतेलाही कळेल की, राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते बॅलेट पेपरबाबत गंभीर आहेत, केवळ राजकारण करून बोलणे हा हेतू नसावा, असे आवाहन केले तर राहुल गांधी या विषयात गंभीर असल्याचेही सिद्ध होईल.
या विषयाचे गांभीर्य ओळखून राहूल गांधी यांनी स्वत: राष्ट्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहावे आणि बॅलेट पेपरचा संपूर्ण खर्च माझ्या खिशातून करेन, जर गांधींनी असे केले तर त्यांचे राजकारण केवळ जनतेच्या पैशातून होत नाही तर गांधी स्वतःच्या खिशातून सुद्धा पैसा खर्च करतात हे ही सिद्ध होईल आणि आणि जनतेलाही कळेल की राहुल गांधी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याबाबत गंभीर आहेत. मला वाटते की गांधी हा मुद्दा नक्कीच गांभीर्याने घेतील आणि माझ्या पत्राला उत्तर सुद्धा देतील असे नमो विचार मंचचे कार्यकारी अध्यक्ष चंदन पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.