Homeनाशिक लोकललोकशाही वाचवण्यासाठी भव्य मोर्चा

लोकशाही वाचवण्यासाठी भव्य मोर्चा

मी भारतीय मी लोकशाहीचा रक्षक सर्वसाधारण जनतेच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या देशातून EVM हद्दपार करण्यासाठी नाशिक प्रभू श्रीरामाच्या पावन भूमीपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी नाशिक येथे झालेल्या राज्य संत म्हणतांच्या व सर्वसाधारण नागरिकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 13डिसेंबर ते सकाळी 10 वाजता नाशिक मध्ये EVM विरोधी मोर्चा काढण्यात येणार आहे.जन आंदोलनाच्या माध्यमातून EVM वापरामधील मधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. EVM च्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय ग्राउंड लेव्हलच्या सर्वसाधारण नागरिकांनी हातात घेतला आहे.नाशिक जिल्ह्याच्या वतीने स्थानिक मतदार, कार्यकर्ते हे आपापल्या विभागातील सर्व लोकशाही प्रेमींना सोबत घेऊन सदर मोर्चात सहभागी होऊन इव्हीएमला हद्दपार होण्यासाठी वॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्या यासाठी एकसंघ होऊन हुकूमशाहीला धडा शिकवण्यासाठी. सर्व मतदारांनी या मोर्चात सहभागी होऊन लोकशाही वाचवण्यासाठी साक्षीदार व्हा व EVM ला हद्दपार करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन एक भारतीय नागरिक या नात्याने करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!