- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी चे नाशिक जिल्हाध्यक्ष आदेश पगारे यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. नाशिक नाशिक येथील प्रिया फ्रेंड सर्कल यांच्यावतीने आदेश पगारे यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला. देवळाली कॅम्प एकता वादीच्या वतीने केक श्रीफळ विशाल देऊन केक कापण्यात आला. यावेळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते दीपक नन्नवरे बाळासाहेब शिंदे मनोहर दोंदे, गवारे तसेच बौद्ध धम्माचे धर्मगुरू बनते सुगंध आधी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. आदेश पगारे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले. विविध प्रायव्हेट रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले . तसेच विविध ठिकाणी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मिलिंद हाटे, प्रशांत पगारे, स्वप्निल पगारे, सिद्धार्थ गायकवाड, सुदर्शन सद्गुरु, सिद्धांत बर्वे आधी समाज बांधव तसेच आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते नेते उपस्थित होते. यावेळी आदेश पगारे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की मी सदैव आंबेडकर चळवळीसाठी काम करीत राहील जनतेचे प्रश्न सोडवणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यामध्ये मी अग्रेसर राहील, बौद्ध धम्म से काम अविरतपणे करील . विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वावरती चालेल व दलित शोषित पीडित आदिवासी या घटकांसाठी अविरतपणे काम करेल अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.
आदेश पगारे यांचा वाढदिवस साजरा.
RELATED ARTICLES
Recent Comments
on Hello world!