- नाशिक येथे मे. वेस्टीज मार्केटींग प्रा.लि. यांचेवर खत नियंत्रण आदेश 1985 अन्वये गुन्हा दाखल
मा. सुनिल बोरकर, संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) महाराष्ट्र राज्य, पुणे, मा.प्रविण देशमुख, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, महाराष्ट्र राज्य पुणे, मा. सुभाष काटकर, विभागीय सहसंचालक, नाशिक, मा. अभिमन्यु काशिद जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक यांच्या मागदर्शनाखाली डॉ.श्री.जगन भावराव सुर्यवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नाशिक यांना गुप्त माहीतीच्या आधारे पाथर्डी फाटा येथील मे. वेस्टीज मार्केटींग प्रा.लि. या कंपनीच्या आऊटलेट मध्ये शेतक-यांना विक्री हेतु विनापरवाना कॅरीयर बेस कॉन्सरशिया, फॉस्फेट सोल्युबीलायझींग फंगल बॅक्टेरीया ही जैविक संशयीत खत मिळून आले. सदर संशयीत जैविक खताचा मे. वेस्टीज मार्केटींग प्रा.लि. शॉप नं 104 अटलांटा शॉपर्स, पाथर्डी फाटा नाशिक यांचेकडे खत विक्रीचा परवाना नसल्याने त्यांना दि.22.05.2025 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली मात्र खत उत्पादक मे. ऑलवीन इंडस्ट्रीज प्रा.लि. प्लॉट नं 174 सेक्टर नं 1 इंडर्सीयल एरीया, पिथमपुर, धार, मध्य प्रदेश किंवा विपणनकर्ता मे. वेस्टीज मार्केटींग प्रा.लि. ए 89, ओखला इंडस्ट्रीयल एरीया फेझ ॥, नवी दिल्ली किंवा विक्रेते किंवा विक्रेते यांनी आजअखेर खुलासा सादर केला नाही.
यास्तव डॉ.श्री. जगन भावराव सुर्यवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नाशिक यांनी उत्पादक मे. ऑलवीन इंडस्ट्रीज प्रा.लि. प्लॉट नं 174 सेक्टर नं 1, इंडर्सीयल एरीया, पिथमपुर, धार, मध्य प्रदेश, विपणनकर्ता मे. वेस्टीज मार्केटींग प्रा.लि. ए 89, ओखला इंडस्ट्रीयल एरीया फेझ ॥, नवी दिल्ली, विक्रेत्या रुपाली सुशील खिंवसरा आणि लि याकत अली खाटीक यांचे विरोधात खत नियंत्रण आदेश 1985 मधील खंड 3, 4, 7,12, 22, 23, 27 बी, 35, अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 मधील कलम 3 व 7 आणि भारतीय संहीता 1924 मधील 318 चा भंग केल्याने प्रमाणे 3050 ग्रॅम वजनाचा रक्कम रु 11915/-मुल्य असलेला संशयीत जैविक खताचा साठा जप्त करून गु.र.नं 165/2025 अन्वये इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शासकीय पंच म्हणून श्री. राहुल शिवाजी अहीरे कृषि अधिकारी पंचायत समिती नाशिक, श्री. सुरेश महादु डगळे, कृषि अधिकारी तालुका कृषि अधिकारी नाशिक कार्यालय, श्री. दिपक नानासाहेब सोमवंशी, मोहीम अधिकारी, जिल्हा परीषद नाशिक यांनी काम पाहीले तर पोलिस कर्मचारी पोलिस कॉन्स्टेबल श्रीमती वैशाली पवार बक्कल नं 1919 व श्री. सुकदेव अहीरे बक्कल नं 2220 यांनी सहकार्य केले आहे.या गुन्हयाचा पुढील तपास पोलि स उपनिरीक्षक युवराज शिरसाठ करीत आहेत.
शेतकरी बांधवांनी कृषि निविष्ठा खरेदी करताना अधिकृत परवानाधारकाकडून पक्कया बीलात खरेदी कराव्यात असे आवाहन, मा. सुभाष काटकर, विभागीय सहसंचालक, नाशिक यांनी केले आहे.
(