Homeताज्या बातम्यानाशकात शिंदे सेनेवर विलास अजयचे राज्य.

नाशकात शिंदे सेनेवर विलास अजयचे राज्य.

नाशिक : ठाकरे सेना शिंदे सेना दोन्हीही शिवसेना अजित पवार गट शरद पवार गट दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यात कुठलीच फूट निर्माण झाली नाही. सत्ता आणि ईडीची भीती पाहता शरद पवार गटासोबत काम करणारे कार्यकर्ते अजित पवार फुटल्यानंतर त्यांच्यासोबत गेले आणि मूळ बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी उद्धव ठाकरेंकडे आहे एकनाथ शिंदे फुटल्यानंतर शिवसेनेचे भित्रे कार्यकर्ते एकनाथ शिंदे सोबत गेले त्यांना सत्ता हवी होती आणि ईडीची भीती होती. एकंदरीत परिस्थिती पाहता या सगळ्यांची भारतीय जनता पार्टी सोबत हात मिळवणे आहे हे नाकारता येणार नाही. स्वायत्त संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. नाशिक मध्ये पाहिलं तर फुटाफुटीच्या राजकारणाला आता जोर आला आहे काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी  भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झाल्यानंतर त्यांना गिरीश महाजन यांनी आधार देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश दिला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. विलास शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवर नाराज असल्याअसल्याचीदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावत शिंदे हे शिंदेंकडेच येणार असे सूचक विधान देखील केले होते त्यानंतर पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर असलेले एकनाथ शिंदे यांचे स्वागत विलास शिंदे यांनी केले होते. या दोन भेटीनंतर शिंदे नक्कीच ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे निश्चित झाले . त्यानंतर शुक्रवारी (दि 27) च्या रात्री खा. संजय राऊत यांनी विलास शिंदे यांना महानगरप्रमुख पदावरून हटवत मामा राजवाडे यांच्याकडे महानगरप्रमुख पद सोपवले. त्यानंतर आज आज रविवारी (दि. 29) सकाळीच मोठं शक्ती प्रदर्शन करत मुंबईच्या दिशेने विलास शिंदे रवाना झाले. दरम्यान आज पक्ष प्रवेशावेळी विलास शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांदीची तलवार देखील भेट देण्यात आली. विलास शिंदे यांच्यासह नाशिकमधील काही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, विष्णूपंत बेडकुळे, पल्लवी पाटील, उषा शेळके, निलेश ठाकरे यांच्यासह पंचायत समिती सदस्य, आणि सरपंचांनी देखील शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला.मात्र महिनाभरात ठाकरे गटाच्या शिवसेनेला हा दुसरा धक्का मानला जात आहे. यावेळी जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख बंटी तिदमे यांच्यासह नाशिकचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!